Mumbai Accident Saamtv
मुंबई/पुणे

Accident News: मन हेलावून टाकणारी घटना! रिक्षावर लोखंडी सळी पडल्याने अपघात; मायलेकीचा दुर्देवी मृत्यू

मन हेलावून टाकणाऱ्या या दुखःद घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai: मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वेकडे एक दुखःद आणि धक्कादायक घटना घडली आहे. इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या चौथ्या मजल्यावरून लोखंडी सळई खाली पडून रस्त्यावरून रिक्षाने प्रवास करणाऱ्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर तिच्यासोबत असणारी मुलगीची प्रकृती गंभीर होती. मात्र उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला. या दुखःद घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

समोर आलेल्या माहितीनुसार, इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या चौथ्या मजल्यावरून लोखंडी सळई खाली पडून माय लेकीचा अपघात झाला. यामध्ये महिलेचा जागेवर दुर्दैवी मृत्यू झाला असून मुलगी गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र तिचीही प्राणज्योत मालवली. ही घटना जोगेश्वरी पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्ग लगत असलेल्या सोनार चाळ परिसरात मलकानी डेव्हलपर्सच्या बांधकाम साईटवर घडल्याचे समोर आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन त्या महिला आणि मुलीला ताबडतोब जवळील ड्रामा केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले. (Accident News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Healthy Lifestyle : सिगारेट-दारूपेक्षाही खतरनाक आहे 'ही' १ गोष्ट, मुंबईच्या प्रसिद्ध डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

Wednesday horoscope: रखडलेलं काम होईल, वायफळ खर्च करू नका; वाचा तुमचं आजचं राशीभविष्य

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT