MUMBAI DADAR BEST ELECTRIC BUS ACCIDENT: TWO DEAD, 13 INJURED AFTER BUS LOSES CONTROL NEAR PLAZA CINEMA Saam Tv
मुंबई/पुणे

Dadar Accident : मुंबईत भीषण अपघात! बेस्ट बसची वाहनांना धडक, २ जणांचा जागीच मृत्यू, १३ गंभीर

Mumbai Dadar Accident News : मुंबईतील दादर पश्चिम येथील प्लाझा सिनेमाजवळ बेस्टच्या इलेक्ट्रिक बसचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून १३ जण जखमी झाले आहेत. पोलिस तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • मुंबईतील दादर परिसरात भीषण अपघात

  • प्लाझा सिनेमाजवळ बेस्टच्या इलेक्ट्रिक बसचा भीषण अपघात

  • चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने अनेक वाहनांना धडक दिली

  • दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून १३ जण जखमी झाले

  • अपघातामुळे परिसरात वाहतूक काही काळ विस्कळीत

Mumbai Dadar Plaza Road Accident News Update मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील सर्वात जास्त गजबजलेला परिसर म्हणून दादारची ओळख आहे. या दादर परिसरात आज आठवड्याच्या पाहिल्याचं दिवशी भीषण दुर्घटना घडली आहे. दादर पश्चिम येथील प्लाझा सिनेमाजवळ बेस्टच्या इलेक्ट्रिक बसचे नियंत्रण सुटून पुढे असलेल्या इतर वाहनांना धडक बसली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून १२ ते १३ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सकाळी साडेनऊच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, बेस्टची ४६३ क्रमांकाची इलेक्ट्रिक बस दादर प्लाझा (Dadar Plaza Road) परिसरातून जात होती. यावेळी अचानक चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बसने रस्त्यावरील अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. अपघातात काही दुचाकी आणि एका कारचे मोठे नुकसान झाले. एका दुचाकीस्वाराची गाडी बसखाली चिरडली गेली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना त्वरित जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दादरमधील प्लाझा सिनेमा (Dadar Plaza Cinema) आणि कोतवाल गार्डन (Kotwal Garden Dadar) परिसर हा सकाळच्या वेळेत अत्यंत वर्दळीचा भाग मानला जातो. सकाळी नागरिकांची कामाला जाण्याची घाई असल्याने या वेळेत येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक आणि नागरिकांची गर्दी असते. अशा वेळी झालेल्या या अपघातामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अपघातानंतर कोतवाल गार्डन चौकापासून पुढील मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. प्राथमिक तपासात चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे समोर आले असले, तरी नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, अपघातग्रस्त बस इलेक्ट्रिक असल्याची माहिती समोर आल्यानंतर बेस्टच्या इलेक्ट्रिक बसच्या (Best Electric Bus Accident) सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पोलिसांकडून आणि बेस्ट प्रशासनाकडून या संपूर्ण घटनेचा सखोल तपास सुरू असून तपासानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Spring Roll Recipe: घरच्या घरी बनवा टेस्टी स्प्रिंग रोल; वाचा सोपी रेसिपी

केतनच्या हत्येमागचं डिजिटल कनेक्शन उघड, गुगलवर शोधले पर्याय, लोहगडावर सराव

Maharashtra News Live Update: केतन अग्रवाल प्रकरणात नवीन अपडेट, केतनला सिया आणि चेतनचा होता संशय

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशी डेब्यू कधी करणार? आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातही नाही मिळाली संधी

धारशिवमध्ये 500 कोटींचे प्लॉट, पवनराजेंची हत्या, संजय राऊतांचा ओमराजे निंबाळकरांवर वेगळाच संशय

SCROLL FOR NEXT