mumbai Crime News
mumbai Crime News  saam tv
मुंबई/पुणे

मुंबई सायबर सेलची मोठी कारवाई; 'या' कंपनीच्या डेटा चोरीप्रकरणी ५ जणांना अटक

साम टिव्ही ब्युरो

सूरज सावंत

मुंबई : ट्रेडिंग कंपनीचा डेटा चोरल्याप्रकरणी मुंबई (Mumbai) सायबर सेलने ५ जणांना अटक केली आहे. आरोपींनी ग्राहकांची ३.५८ कोटींची फसवणूक केली. यातील तीन आरोपी हे शेअर ट्रेडिंग कंपनीचे माजी कर्मचारी आहेत. या आरोपींनी स्टॉक ट्रेडिंग कंपनीचा डेटा चोरला (Theft) आणि तीन लोकांचे शेअर्स ३.५८ कोटींना विकल्याचा आरोप आहे. त्यानंतर पोलिसांनी सदर कारवाई केली आहे. ( Mumbai Crime News In Marathi )

सायबर सेलचे वरिष्ठ अधिकारी विजय चंदनशिवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जून महिन्यात ट्रेडिंग कंपनीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तक्रारीत कंपनीने सांगितले की, ही डेटा चोरी मे २०२२ ते ८ जून दरम्यान झाली आहे. त्यानंतर आरोपींनी स्टॉक ट्रेडिंग कंपनीचे कर्मचारी असल्याचे भासवत तीन ग्राहकांना फोन करून त्यांचे ओटीपी मागितले. ओटीपी मिळताच त्यांनी त्या ग्राहकांच्या डिमॅट खात्यात प्रवेश घेतला.

अॅक्सेस घेतल्यानंतर आरोपींनी ते शेअर्स विकले आणि ते विकल्यानंतर त्यांना ३.५८ कोटी रुपये मिळाले, जे त्यांनी दुसऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी वापरले. ज्या कंपनीचे शेअर्स विकत घेतले त्या कंपनीची शेअर्स मार्केटमध्ये चांगली कामगिरी होत नाही. त्या कंपनीतील शेअर्स खरेदी करण्यासाठी या आरोपींना काही प्रमाणात कमिशन देण्यात आले असावे, असा पोलिसांना संशय आहे.

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकाने ओटीपी मिळविण्यासाठी इंटरनेटवरून कॉल केला होता आणि हा कॉल युनायटेड किंगडम (यूके) येथून असल्याचे दिसून आले. अशा प्रकारे आरोपींनी अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने पोलिस तपास करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मी दिलेलं चॅलेंज स्वीकारलं नाही; श्रीकांत शिंदेंनी आदित्य ठाकरेंना डिवचलं

Who is Shashank Rao: बेस्ट स्ट्राईक, ऑटो युनियनचा झंझावती आवाज शशांक राव आहेत तरी कोण?

Maharashtra Election: राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी येणार एकाच मंचावर? शिवाजी पार्कात होणार सभा

Bihar Wedding Viral News : अजब-गजब प्रेम कहाणी: विधूर जावयासोबत सासऱ्यानेच लावलं बायकोचं लग्न

May Month Horoscope: या राशींसाठी येणारे 30 दिवस ठरतील वरदान, मेष राशीत मंगळाचा प्रवेश ठरणार लाभदायक

SCROLL FOR NEXT