Sameer Wankhede Saam TV
मुंबई/पुणे

किरण गोसावी, मनिष भानुशाली यांनी कारवाई मध्ये मदत केली- NCB

मुंबईत एनसीबीने (Narcotics Control Bureau) ३ ऑक्टोबर रोजी मुंबई - गोवा क्रूझवर कारवाई करुन काही लोकांना अटक केली होती.

वृत्तसंस्था

मुंबई: नवाब मलिक यांच्या वादळी पत्रकार परिषदेनंतर एकच खळबळ उडाळी आहे. त्या आरोपानंतर मनिष भानुशाली यांनी साम टीव्ही वर आपली प्रतिक्रिया दिली. त्यानंतर आता NCB नं या आरोपानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे. किरण गोसावी आणि मनिष भानुषाली यांनी कारवाई मध्ये मदत केली असल्याची प्रतिक्रिया NCB च्या वतीनं देण्यात आली आहे. आणि आमच्यावर झालेले आरोप बिनबुडाचे असल्याचे स्पष्टिकरण NCB ने दिले आहे. त्याचबरोबर कारवाई सर्व नियमानुसार झाली असल्याचंही NCB ने म्हटले आहे.

दरम्यान अरबाजला हाताला धरुन घेवून जाणाऱ्या मनिश भानुशाली यांनी साम टीव्ही वर त्यांचं मत मांडलं. बोलताना ते म्हणाले ''मी देशासाठी हे काम केलं आहे. मला माझ्या मित्राने पार्टीबाबत माहिती दिली तिच माहिती मी NCB ला दिली. मग मला NCB ने च घटनास्थळी नेले. पार्टीवर रेड टाकल्यानंतर ज्या लोकांना पकडले होते त्यांच्याबाबत मला काहीच माहिती नव्हती कारण त्यांनी मास्क घातला होता''. मनिश भानुशाली यांनी त्यांच्या जिवाला धोका असून संरक्षण देण्याची विनंती केली आहे.

मुंबईत एनसीबीने (Narcotics Control Bureau) ३ ऑक्टोबर रोजी मुंबई - गोवा क्रूझवर कारवाई करुन काही लोकांना अटक केली होती. यामध्ये बॉलिवूडचा स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि इतर काहींना अटक केलेली आहे. मात्र आर्यन खानला अटक करताना ज्या व्यक्तीचा फोटो व्हायरल झाला आहे, तो के.पी.गोसावी नावाचा व्यक्ती एनसीबीचा अधिकारी नसल्याची बाब खुद्द एनसीबीने सांगितली आहे. तसेच अरबाज मर्चंटला अटक करणारा मनिष भानुशाली हा भाजपचा उपाध्यक्ष असून तोही एनसीबीचा अधिकारी नसल्याचे समोर आले आहे. मग या दोघांनी कोणत्या अधिकारात हायप्रोफाईल लोकांना अटक केली, याचे उत्तर एनसीबीने दिले पाहिजे असा सणसणाटी आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला होता. दरम्यान मलिकांच्या आरोपानंतर भाजप आणि NCB काय स्पष्टिकरण देतं का? हे पाहावं लागेल.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT