Mira Road Murder News saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: मिरारोड हत्याकांडाची महिला आयोगाकडून दखल! आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी

Mumbai Mira Road Murder News: या प्रकरणात महिला आयोगाच्या सदस्य अॅड. गौरी छाबरीया आणि उत्कर्षां रूपवते यांनी नया नगर पोलीस ठाण्यात भेट दिली.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai Live In Relationship Murder News: मिरारोड येथील हत्याकांड प्रकरणाची महिला आयोगाने दखल घेतली आहे. महिला आयोगाच्या सदस्यांनी नया नगर पोलीस ठाण्यात भेट देऊन आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मिरारोड येथील गीता नगरच्या सातव्या मजल्यावर लिव्हइनमध्ये राहणाऱ्या 32 वर्षीय तरुणीची निर्दयीपणे हत्या करून तिच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केल्याची धक्कादायक घटना समोर बुधवारी आली. या संतापजनक घटनचेची दखल आता महिला आयोगाने देखील घेतली आहे. या प्रकरणात महिला आयोगाच्या सदस्य अॅड. गौरी छाबरीया आणि उत्कर्षां रूपवते यांनी नया नगर पोलीस ठाण्यात भेट दिली.

पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांची भेट घेऊन त्यांनी आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. आरोपीने ज्या पद्धतीने महिलेची हत्या केली. ती अतिश्य निर्दयी आणि वेदनादायी आहे. मात्र माणसाच्या मनात असलेली हिंसा जेव्हा संपेल तेव्हा अशा महिलांच्या क्रूर हत्या बंद होतील असे मत महिला आयोगाच्या सदस्यांनी व्यक्त केले आहे.

महिला आयोग्याच्या सदस्या म्हणाल्या, 4 तारखेला ही घटना घडली आणि काल पोलिसांना याविषयी माहिती मिळाली. प्राथमिक माहितीनुसार आरोपी आणि पीडित महिला हे सुमारे 10 वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहत होते. त्यांचे लग्न झाले नव्हते. त्यांच्या वयात मोठा गॅप होता. आरोपी 55 वर्षांचा होता तर पीडित महिला 34 वर्षांच्या होत्या. (Breaking News)

अशात त्यांच्यात अनेकदा वाद होता होते. या रागाच्या भरातच त्याने हे कृत्य केलं असे सध्या दिसत आहे. त्याने ज्या प्रकारे ही हत्या केली ते अतिशय वेदनादायी आहे. त्या महिलेच्या शरीराचे तुकडे तुकडे करून त्यांची विल्हेवाट लावण्याचा त्याने प्रयत्न केला. क्रूरता कोणत्या परिसिमेला जाऊ शकते याचं हे उदाहरण आहे असे त्या म्हणाल्या. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

High Court : भिकारी बोलणं अपमानजनक नाही, न्यायालयाचं महत्त्वपूर्ण मत

General Knowledge: दारू व्हेज की नॉनव्हेज? काय आहे खरं उत्तर?

Success Story: १५०० रूपयांच्या बिझनेसला ३ कोटींपर्यंत पोहोचवलं, जाणून घेऊया संगीता यांची यशोगाथा

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी 'हे' व्यायम नक्की करून बघा

SCROLL FOR NEXT