Kalyan Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan Crime: संतापजनक! कॅब चालकाकडून प्रवासी तरुणीचा विनयभंग, कल्याण पूर्वेतील घटना

Mumbai Crime News: तरुणीने आरडाओरडा केल्याने कॅब चालक पळून गेला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Gangappa Pujari

अभिजीत देशमुख, प्रतिनिधी

Navi Mumbai Crime:

नवी मुंबईहून कल्याणच्या दिशेने कॅबने प्रवास करणाऱ्या एका तरुणीचा कॅब चालकाने प्रवासादरम्यान विनयभंग केल्याची घटना कल्याण पूर्वेत घडली आहे. तरुणीने आरडाओरडा केल्याने कॅब चालक पळून गेला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नवी मुंबईहून (Navi Mumbai) कल्याणच्या दिशेने कॅबने प्रवास करणाऱ्या एका तरुणीचा कॅब चालकाने प्रवासादरम्यान विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पीडित तरुणी ही नवी मुंबईमध्ये एका कंपनीमध्ये काम करते. शनिवारी (१४, ऑक्टोंबर) रात्रीच्या सुमारास काम आटोपून कॅबने घरी येत असताना हा प्रकार घडला. कॅब चालकाच्या कृत्यानंतर पीडित तरुणीने आरडा ओरडा केला. ज्यामुळे घाबरलेल्या कॅब चालकाने पळ काढला.

याप्रकरणी पीडित तरुणीने कोळशेवाडी पोलीस ठाण्यात कॅब चालका विरोधात तक्रार नोंदवली आहे. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार कॅब चालक राकेश मिश्रा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या फरार कॅब चालक राकेश मिश्राचा शोध घेत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: ४,००० किमीचा प्रवास! देशातील सर्वात लांब महामार्ग कोणता?

EPFO New Scheme : EPFO ची नवी योजना, १ लाखांपर्यंत पगारदारांना १५ हजारांचा फायदा! ३० एप्रिलपर्यंत नोंदणीची संधी |VIDEO

Maharashtra Live News Update: माधवी खंडाळकर अजित पवारांच्या भेटीला

Shraddha Kapoor: बॉलिवूडच्या 'स्त्री'ची हॉलिवूडमध्ये एन्ट्री; डिस्नेच्या 'या' चित्रपटात करणार श्रद्धा कपूर

Accident News : स्कूल बसचा भीषण अपघात, झाडाला धडक दिल्यानंतर...; २२ विद्यार्थी जखमी

SCROLL FOR NEXT