Mumbai Crime News woman was sitting in car thief stole a purse andheri incident CCTV video viral Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: महिला कारमध्ये बसलेली, तो दबक्या पावलांनी आला अन्... धक्कादायक घटनेचा VIDEO

Mumbai Andheri Crime News: अंधेरीत एका चोराने वेळ विचारण्याच्या बहाण्याने महिलेसोबत असं काही कृत्य केलंय, की जे पाहून अनेकांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.

Satish Daud

संजय गडदे, साम टीव्ही

Mumbai Andheri Crime News: गेल्या काही दिवसांपासून मुंबईत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. चोऱ्या, खून, मारामाऱ्या दरोडे महिला अत्याचार अशा गंभीर घटना घडत आहेत. एकीकडे मुंबई पोलीस चोरांच्या मुसक्या आवळत असताना दुसरीकडे अंधेरीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंधेरीत एका चोराने वेळ विचारण्याच्या बहाण्याने महिलेसोबत असं काही कृत्य केलंय, की जे पाहून अनेकांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. (Latest Marathi News)

"आपके पैसे निचे गिरे है" असे सांगत किती वाजले आहेत, अशी विचारणा करत चोरट्याने महिलेचं लक्ष विचलित केलं. महिलेचे लक्ष विचलित झाल्यानंतर चोरट्याने कारच्या पाठीमागच्या सीटवर ठेवलेली पर्स लांबवली. अंधेरी पूर्वेकडील (Andheri News) चिनॉय कॉलेज परिसरात ही घटना घडली आहे. या संपूर्ण घटनेचं सीसीटीव्ही फुजेट समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्यवसायाने डॉक्टर असलेली महिला मंगळवारी दुपारी आपल्या मुलीला अंधेरी पूर्वेकडील लेडी वसंतजी स्कूल या शाळेमध्ये सोडण्यासाठी गेली होती. यावेळी महिलेने आपली कार चिनॉय कॉलेज समोर उभी केली. मुलीला सोडून महिला डॉक्टर आपल्या गाडीमध्ये बसली असताना एक अनोळखी व्यक्ती जवळ आला.

"आपके पैसे निचे गिरे है" असे बोलून या व्यक्तीने किती वाजले आहेत, अशी विचारणा महिलेकडे केली. दरम्यान, महिलेचं लक्ष विचलित झाल्यानंतर त्याने कारच्या पाठीमागच्या सीटवर ठेवलेली पर्स, त्यामधील ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम (Crime News) घेऊन पोबारा केला.

महिलेसोबत घडलेल्या या विचित्र प्रकाराचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. याबाबत महिला डॉक्टरने अंधेरी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन त्या अनोळखी व्यक्तीविरोधात तक्रार नोंद केली आहे. या तक्रारीनुसार अंधेरी पोलिसांनी कलम 379 भादवि अन्वये अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद केला असून आरोपीचा शोध सुरू केला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Curry Leaves Water Benefits: सकाळी रिकाम्या पोटी प्या कढीपत्त्याचे पाणी; होतील 'हे' भन्नाट फायदे

EPFO Update: नव्या कर्मचाऱ्यांना मिळणार ₹15,000! हप्ता मिळवण्यासाठी लगेच करा हे काम

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीला

Marriage Line in Palmistry: लग्न कधी होणार, कसा मिळेल पार्टनर? हातावरील ही रेषा देते महत्त्वाचे संकेत!

डायबिटिस पेशंटसाठी 10 नैसर्गिक उपाय, हे पदार्थ खा ब्लड शुगर राहील कंट्रोलमध्ये

SCROLL FOR NEXT