Mumbai Accident update  Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Accident : मुंबई हादरली! आधी महिलेवर अत्याचार केला, नंतर गळा आवळून संपवलं

Mumbai Accident update : मुंबईतील मालवणीत महिलेवर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेने मुंबईतील खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

मुंबईत महिलेसोबत बलात्कार करून हत्या

मृतदेह महिलेजवळ मार्वे रोडजवळ सापडला

पोलिसांनी आरोपीला मथुरेतून अटक

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबईच्या मालाडमध्ये महिलेवर बलात्कार करून हत्या केल्याची घटना घडली आहे. मालाडच्या मालवणी परिसरात ही घटना घडली. महिलेच्या हत्येने परिसरात खळबळ उडाली. या हत्या प्रकरणामुळे मुंबईतील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला उत्तर प्रदेशातून अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या मालाडमधील मालवणीतील सावंत कंपाऊंड, मार्वे रोडजवळ महिलेचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर पोलिसांच्या प्राथमिक तपासात ४५ वर्षीय महिलेवर बलात्कारानंतर गळा आवळून खून झाल्याचे स्पष्ट झाले. मालवणी परिसरातील या संतापजनक घटनेचा पोलिसांकडून अखेर उलगडा झाला.

या गुन्ह्याची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. मोबाईल लोकेशनचे तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपी चंद्रपाल (वय ३४) याला मथुरा येथून अटक केली. त्यानंतर पोलिसांच्या सखोल चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपीला ट्रान्झिट रिमांडनंतर मुंबईत आणून न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यास ६ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर आयुक्त शशीकुमार मीना, उपायुक्त संदीप जाधव, सहा. आयुक्त निता पाडवी यांच्या नेतृत्वाखाली तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर आणि पोलीस निरीक्षक जीवन भातकुले, पोलीस उपनिरीक्षक अरुण सावंत, सपोनी शिळमकर, सपोनी विचारे, पोउनि हिंडे, पोउनी मासाळ या सर्व तपास अधिकाऱ्यांच्या अथक प्रयत्नांतून पार पडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos: अस्सल मराठमोळं सौंदर्य, प्राजक्ताच्या लेटेस्ट फोटोशूटने केलं सर्वांनाच घायाळ

आपण सोबत निवडणूक लढलो...पक्षप्रवेशावरील नाराजीच्या चर्चेवर एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, VIDEO

Maharashtra Live News Update: महाबळेश्वरमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या विरोधात ठिय्या आंदोलन

Maharashtra Politics : घराणेशाहीचा रेकॉर्ड मोडला; भाजप अन् शिंदे गटाकडून एकाच कुटुंबातील ६ जणांना उमेदवारी

Winter Health: हिवाळ्यात दिवसभर किती लिटर पाणी प्यावे?

SCROLL FOR NEXT