Mumbai Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime : केक खरेदीसाठी आला अन् मोबाईल चोरून गेला; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

एक व्यक्ती केक घेण्याचे नाटक करून दुकानदार महिलेचा फोन घेऊन फरार झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

संजय गडदे

Mumbai Crime : मुंबईत चोरीच्या घटनांचे प्रमाण सातत्याने वाढत चालले आहे. अनेक ठिकाणी साखळी चोरांची टोळी सक्रिय झाली आहे. या चोरट्यांपासून स्वत:चा बचाव करणे सामान्य नागरिकांसाठी चिंतेची बाब बनली आहे. मुंबईच्या वाकोला येथे अशीच एक चोरीची घटना समोर आली आहे. या घटनेत एक व्यक्ती केक घेण्याचे नाटक करून दुकानदार महिलेचा फोन घेऊन फरार झाला आहे. महिलेने या बाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून चोरट्याचा शोध सुरू आहे. (Latest Mumbai Crime News)

मुंबईच्या वाकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका केक शॉपमध्ये केक खरेदीसाठी आलेल्या तरुणाने मोबाईल चोरी केल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सांताक्रुज पूर्वेकडील प्रभात कॉलनी येथील केक शॉपमध्ये ही घटना घडली आहे.सोमवारी ही घटना घडली असून वीरेंद्र पांडे या ट्विटर वापरकर्त्याने घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ मुंबई पोलिसांना दिला आहे.

या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो तरुण दुकानदार महिलेकडे केकची मागणी करत आहे. यावेळी त्यांच्यात झालेले संभाषण देखील स्पष्टपणे ऐकायला मिळत आहे. आरोपी त्या महिलेसोबत बोलत असताना तो ग्राहक आपल्या पतीच्या ओळखीतला असावा असा समज महिला दुकानदाराचा झाला. शेवटी केक खरेदी करून झाल्यानंतर त्या तरुणाने महिलेकडे मोबाईल मागितला आणि खरेदी केलेला केक जागेवर ठेवूनच तो दोन मिनिटात पुन्हा येतो असे सांगून मोबाईल घेऊन गायब झाला. ही सर्व घटना दुकानात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे.

मुंबईसह पुण्यात देखील चरीच्या घटनांचे प्रमाण वाढत चालले आहे. ६ मार्च रोजी पुणे पीएमपी बसमधून एका महिला प्रवाशाच्या पर्समधून चोरट्यांनी सुमारे एक लाख ६५ हजार रुपयांचे दागिने लांबवल्याची घटना घडली होती. कात्रज ते गाडीतळ हडपसर प्रवासादरम्यान हा प्रकार घडला असून याबाबत हडपसर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला किती कोटी मिळणार? उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिली महत्वाची माहिती

Maharashtra News Live Update: भोंदू खरातच्या कबुलीनंतर शिवनिका संस्थानचे सचिव नामकर्ण आवारेला अटक

BP - Diabetes : कडक उन्हामुळे वाढते BP अन् शुगर; कुणाला सर्वाधिक धोका?

NEET परीक्षा कधी जाहीर होणार? महत्त्वाची अपडेट समोर

Aadhaar Card Update: मोठी बातमी! आधार बनवण्यासाठी 'हे' डॉक्यूमेंट्स आवश्यक, नवे नियम लागू, पण कोणते? वाचा...

SCROLL FOR NEXT