Mumbai Crime Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime : अनैतिक संबंधात अडसर ठरत होता पती; पत्नीचं कृत्य पाहून पोलीसही हादरले

नसीम शेख (वय २२) असं मृत व्यक्तीचे नाव आहे.

सूरज सावंत

मुंबई : मुंबईच्या (Mumbai) साकीनाका परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली. अनैतिक संबधास अडसर ठरणाऱ्या पतीची पत्नीनेच हत्या केली. पत्नीने वायरने गळा आवळून पतीचा खून (Crime) केला. त्यानंतर मृतदेह घरातील बेडमध्ये लपवून ठेवला. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी पत्नीला सोमवारी रात्री अटक केली. (Mumbai Crime News)

नसीम शेख (वय २२) असं मृत व्यक्तीचे नाव आहे. तर रूबीना शेख असं संशयित आरोपी पत्नीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, मृत नसीम शेख याचा २०१७ साली रूबीना शेख नामक महिलेशी विवाह झाला होता. नसीम हा टेलरिंगचे काम करत होता. १४ जुलै रोजी नसीम याचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी लाकडी बेडमध्ये आढळून आला.

नसीम याची हत्या त्याच्या पत्नीनेच केली असावी असा पोलिसांना संशय होता. याप्रकरणी पोलिसांनी नसीमची पत्नी रूबीना हिला ताब्यात घेतलं होतं. सुरूवातीला रूबीनाने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्यानंतर खाक्या दाखवताच तिने आपला गुन्हा कबूल केला. (Mumbai Todays News)

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नसीमची पत्नी रूबीना हिचे एका व्यक्तीसोबत अनैतिक संबध होते. याची कुणकुण नसीमला लागली होती. नसीम हा रूबीनाच्या अनैतिक संबधाला अडसर ठरत होता. त्यामुळे रूबीनाने १४ जुलैला रात्री वायरने नसीमचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तिने मृतदेह घरातील लाकडी बेडमध्ये लपवून ठेवला. आणि आपल्या माहेरी निघून गेली.

दरम्यान, दोन तीन दिवसानंतर शेजाऱ्यांना घरातून वास येत असल्याने त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. नसीम याचा गळा आवळून खून झाल्याचा अहवाल शवविच्छेदनातून पोलिसांना प्राप्त झाला. (Mumbai Latest Crime News)

यानंतर पोलिसांनी नसीमच्या पत्नीला ताब्यात घेऊन तिची कसून चौकळी केली. सुरूवातीला रूबीना हिने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्यानंतर तिने आपला गुन्हा कबूल केला. या हत्येत रुबीनासह अन्य आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून साकीनाका पोलिस याबाबत अधिकचा तपास करत आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : यवतमाळच्या घाटंजी तालुक्यात 2 पूरबळी; यवतमाळ जिल्ह्याला पावसाने झोडपलं

'पप्पा मला अ‍ॅडमिशन घेऊन द्या ना'; पैशांअभावी वडिलांचा थांबण्याचा सल्ला; घरी कुणी नसताना लेकीनं आयुष्य संपवलं

Nashik News: नाशिकमध्ये धो धो! गोदामातेची पुरातच आरती, भक्तांची मांदियाळी|VIDEO

Skin Care Tips: पावसाळ्यात ग्लोइंग त्वचा हवीये, मग फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

Shubman Gill : शुभमन गिलकडून झाली मोठी चूक! भारताच्या कॅप्टनचा 'तो' व्हिडीओ लीक, बीसीसीआयला फटका बसणार?

SCROLL FOR NEXT