Mumbai Crime News SaamTv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News : विकृती! फूड डिलिव्हरी बॉयकडून कुत्र्यावर अनैसर्गिक अत्याचार, आता आली पश्चातापाची वेळ

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

सुरज सावंत

Mumbai Crime News : पुण्यात रेडकासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना ताजी असतानाच मुंबईतून (Mumbai) एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका फूड डिलिव्हरी बॉयने कुत्र्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मुंबईतील पवई पोलिसांनी (Police)एका २८ वर्षीय फूड डिलिव्हरी बॉयला अटक केली आहे. प्राणी कल्याणासाठी काम करणाऱ्या बॉम्बे अॅनिमल राइट्स या स्वयंसेवी संस्थेच्या सदस्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आला. त्यानंतर आरोपाला बड्या ठोकण्यात आल्या. (Mumbai Crime News Update)

या प्रकरणी पवई पोलिसांनी आरोपी आकाश मोरे याच्याविरुद्ध भादंवि कलम 377 आणि 11 (अ) अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पोलिसांनी सांगितले की, आरोपी अनेक दिवसांपासून कुत्र्यासोबत असे वर्तन करत असल्याची माहिती मिळाली आहे, हे कृत्य करत असताना एका व्यक्तीने हा व्हिडीओ बनवून एका प्राणी कार्यकर्त्याला पाठवला, त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

पुण्यात रेडकासोबत अनैसर्गिक कृत्य

नदीपात्रात बांधलेल्या एका रेडकासोबतच एका तरुणाने अनैसर्गिक कृत्य केल्याचा घृणास्पद प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. ही घटना 27 ऑक्टोबर रोजी रात्री 10 च्या सुमारास घडली. याप्रकरणी संबंधित आरोपीविरोधात डेक्कन पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीवर अनैसर्गिक कृत्य तसेच प्राण्याचा छळ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics : भाजप मंत्र्यांकडून ऑपरेशन लोटस; बडा नेता कमळ हाती घेणार?

Accident News : हृदयद्रावक! दिवाळीला मामाच्या गावी जाताना काळाचा घाला; थारच्या धडकेत दोन मुलांसह आई-वडिलांचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT