unknown man molest female in western railway borivali railway station  saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime : मुंबईत चाललंय काय ? लोकलमध्ये घुसून महिलेचा विनयभंग

पश्चिम रेल्वेच्या (Railway) बोरिवली स्थानकात महिलेसोबत विनंयभंगाचा प्रकार घडला आहे.

साम टिव्ही ब्युरो

संजय गडदे

Mumbai News : मुंबईत महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबईत पश्चिम रेल्वेच्या (Railway) बोरिवली स्थानकात महिलेसोबत विनंयभंगाचा प्रकार घडला आहे. बोरिवली स्थानकातून अंधेरीच्या दिशेने कामानिमित्त प्रवास करणाऱ्या एका प्रवासी महिलेचा (Woman) विनयभंग झाल्याचा प्रकार महिला डब्यात घडला आहे. यामुळे मुंबईत महिला सुरक्षित आहे का ? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. (Mumbai News In Marathi )

मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या बोरिवली स्थानकात महिलेसोबत विनंयभंगाचा प्रकार घडल्याने महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पश्चिम रेल्वेच्या बोरीवली स्थानकातून अंधेरीच्या दिशेने कामानिमित्त प्रवास करणाऱ्या एका प्रवासी महिलेचा विनयभंग झाल्याचा धक्कादाय प्रकार महिला डब्ब्यात घडला आहे.

काल बुधवारी सकाळी १० ते ११ दरम्यान जोगेश्वरी ते अंधेरीदरम्यान ट्रेनमध्ये महिला डब्यामध्ये घुसून एका व्यक्तीने महिलेचे विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या महिलेने अंधेरी रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांच्यासोबत झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर अंधेरी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.

पोलिसांनी तपास केला सुरू

महिलेच्या तक्रारीनंतर अंधेरी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज तपासून अंधेरी पोलिसांनी तपासासाठी चार पथके तयार केली आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू केला आहे. मात्र, पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीची माहिती मिळाली आहे. त्यामध्ये आरोपी हा मनोरुग्ण असल्याची माहिती मिळत आहे. या आरोपीचा शोध अंधेरी आणि बोरीवली रेल्वे पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT