mumbai crime news  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: नात्याला काळीमा; मुलाने वडिलांसोबत केलं हादरवणारं कृत्य, परिसरात खळबळ

मुंबईतून धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. नशेच्या आहारी गेलेल्या वडिलांची मुलानेच हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

सूरज सावंत

Mumbai News: मुंबईतून धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. नशेच्या आहारी गेलेल्या वडिलांची मुलानेच हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईच्या विक्रोळी परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, विक्रोळी परिसरात नशेच्या आहारी गेलेल्या वडिलांची मुलानेच हत्या केल्याची घटना घडली आहे. विक्रोळी हरियाली व्हिलेज, इंदिराननगर झोपडपट्टीत संजय साळवे हे आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होते.

संजय साळवे यांना दारूचे व्यसन आहे. त्या रागातून त्यांचा मुलगा राहुल साळे याच्यासोबत खटके उडायचे. रविवारी संजय साळवे हे दारुच्या नशेत असताना त्यांचा मुलगा राहुलसोबत वाद झाला. या वादात राहुलने संजय यांना मारहाण केली. या मारहाणीत संजय यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

संजय साळवे यांचा मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. संजय यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची बहिणीने पोलिसांत धाव घेतली. त्यांच्या बहिणीने पोलिसांत जाऊन राहुल साळवेच्या विरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार विक्रोळी पोलिसांत कलम ३०२ भादवी कलमांतर्गत राहुल साळवे यांच्या विरोधात गुन्हा केला आहे.

पोलिसांनी राहुल साळवेच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर राहुल साळवेचा शोध सुरू केला. त्यानंतर विक्रोळी पोलिसांनी त्याला अटक केली.

मांत्रिक मध्यरात्री शेजारच्या घराबाहेर करायचा भलतच काम

मुंबईच्या बोरिवली एमएचबी कॉलनी पोलिसांनी अशा एका मांत्रिक बाबास अटक केली आहे, जो आपल्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबातील एकुलत्या एक मुलास जादूटोणा करून मारण्याचा विचार करत होता. गोकुळ भारवड (६७ वर्षे) असं अटक करण्यात आलेल्या मांत्रिक बंधू बाबा चे नाव असून तो दहिसर पश्चिमेकडील कांदरपाडा परिसरात राहणारा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

चॉकलेटचं आमिष दाखवत 3 वर्षांच्या चिमुकलीला सोबत नेलं, २० मिनिटांनी घरी आणून सोडलं... नराधमाचं संतापजनक कृत्य

जेवताना तोंडी लावण्यासाठी बनवा वांग्याचे कुरकुरीत काप; सोपी आणि चवदार रेसिपी!

SCROLL FOR NEXT