Mumbai Crime News Saam Digital
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: साकीनाका पोलिसांची मोठी कारवाई, सापळा रचून ९ कोटींचे अमलीपदार्थ जप्त

Mumbai Crime News: मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी तब्बल नऊ कोटी रुपये किमतीचे अमलीपदार्थ जप्त केले आहेत. रात्रपाळी वर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी साकी विहार रोड, हंसा इंडस्ट्रियल इस्टेट समोर सापळा रचून दोन नायजेरियन तरुणांना अटक केली आहे.

Sandeep Gawade

Mumbai Crime News

मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी तब्बल नऊ कोटी रुपये किमतीचे अमलीपदार्थ जप्त केले आहेत. रात्रपाळी वर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी साकी विहार रोड, हंसा इंडस्ट्रियल इस्टेट समोर सापळा रचून दोन नायजेरियन तरुणांना अटक केली आहे. डॅनियल नायमेक (38 वर्ष) जोएल अलेजांद्रो वेरा (19 वर्ष) अशी अटक करण्यात आलेल्या नायजेरियन तरुणांची नावे असून ते दोघेही मुंबईत अमलीपदार्थ विक्री करण्यासाठी आले होते.

संशयित आरोपीकडून साकीनाका पोलिसांनी अमलीपदार्थांच्या 88 भरीव कॅप्सूल जप्त केल्या आहेत, या कॅप्सूल चा बाजार भाव 9 कोटी रुपये आहे. सध्या साकीनाका पोलिसांनी या दोन्ही आरोपींना अटक करून त्यांचे आणखी मुंबईमध्ये साथीदार आहेत का मुंबई शहरात कसे हे अमलीपदार्थांचा पुरवठा करत होते . पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पत्नी मुलांची हत्या.. व्यावसायिकाकडून ४०० कोटींची फसवणूक

पत्नी आणि मुलांची हत्या करणाऱ्या कल्याणमधील एका व्यावसायिकाने हजारो लोकांची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तब्बल ३५०० जणांना ४०० कोटींचा गंडा घातला आहे. फसवणूक झालेल्या नागरिकांनी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांच्या नेतृत्वात कल्याणचे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांची भेट घेतली . या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढील कारवाई होणार असल्याची माहिती घेटे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar Tourism : २०० रूपयात वीकेंड करा एन्जॉय, पालघरमधील 'या' ठिकाणांना भेट द्याच

IPL मध्ये खेळू दिले नाही, RCB चा स्टार खेळाडू थेट कोर्टात गेला; नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : पुण्यात पालखी सोहळ्यावर मधमाश्यांचा हल्ला; ६५ जण जखमी

KDMC : केडीएमसीमधील धक्कादायक प्रकार उघड, महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याचा आरोप; वरिष्ठ लिपिक निलंबित

Chanakya Niti: नोकरीत यश मिळवायचंय? चाणक्यांचे हे अनमोल विचार नक्की वाचा, मिळेल घवघवीत यश

SCROLL FOR NEXT