Mumbai Crime News saam Digital
मुंबई/पुणे

Mumbai Crime News : ऐकावं ते नवलच! पोलिसांच्याच घरी टाकला डाका, दरोडेखोराने १३ पोलिसांची घरं फोडली

Mumbai Crime : संपूर्ण पोलीस खात्याला हादरवून टाकणारी घटना माहीम पोलीस वसाहतीत घडली होती.अखेर पोलिसांच्याच घरांमध्ये चोरी करणाऱ्या या सराईत चोराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. कमृद्दिन शेख (वय ४४) असं या सराईत चोराचं नाव आहे.

Sandeep Gawade

संपूर्ण पोलीस खात्याला हादरवून टाकणारी घटना माहीम पोलीस वसाहतीत घडली होती. एक दोन नाही तर तब्बल १३ पोलिसांच्या घरी चोरी करण्यात आली होती. एकीकडे लैंगिक अत्याचारासाख्या घटना वाढल्या आहेच. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात घडणाऱ्या चोरीच्या घटना आणि राज्यातील गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं असताना पोलिसांच्या घरी घरफोडी झाल्यामुळे खळबळ माजली होती.

जनतेचं रक्षण करण्यासाठी ज्यांच्यावर जबाबदारी असते त्यांच्याच घरी चोरी झाल्यामुळे मुंबई पोलिसांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पोलिसांच्या कर्तुत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. अखेर पोलिसांच्याच घरांमध्ये चोरी करणाऱ्या या सराईत चोराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. कमृद्दिन शेख,४४ असं या सराईत चोराचं नाव असून त्याचा धाडसाबात आश्चर्य व्यक्त होत आहे. रात्रपाळीवर असलेले पोलीस, सुट्टीनिमित्त गावी गेलेल्या पोलिसांची घर तसेच निवृत्त पोलिसांच्या बंद घरांची रेकी केली जात असे. त्यानंतर योग्य संधी साधून मध्यरात्री पोलिसांच्या घरांचा कडी-कोयंडा तोडून चोरी केली जात असे.

कमृद्दिनने मध्यरात्री दबक्या पावलाने पोलीस वसाहतीत येत पोलिसांची घरं बंद असल्याची खात्री केली होती. पोलिसांच्या घरातून रोकड आणि मौल्यवान वस्तूंची तसेच देवाच्या चांदीच्या मूर्तीची चोरी केली होती. पोलिसांच्या घरांसह प्ले ग्रुप, नर्सरी आणि वसाहतीच्या कार्यालयाला देखील लक्ष करण्यात आलं होतं. या सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाल्या होत्या. त्याच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली आहे.कमृद्दिन शेख वर घरफोडी आणि चोरीचे आठ गुन्हे नोंद आहेत. दरम्यान पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याची २८ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आनंदवार्ता! अखेर मान्सून केरळमध्ये धडकला, महाराष्ट्रात कधी पोहचणार? तारखा आतच नोट करा

Maharashtra News Live Update: छेडछाडीचा जाब विचारणाऱ्या तरुणाची निर्घृण हत्या; अमरावतीत खळबळ

World Environment Day: जागतिक पर्यावरण दिनाची यंदाच्या वर्षीची थीम काय आहे?

भाजी करपली? फेकून देऊ नका, दह्याची ही सोपी ट्रिक वापरून बघा

Gopalgad Fort : शिवकालीन पराक्रमाचा वारसा! गोपाळगड किल्ला पर्यटकांसाठी खुला, अरबी समुद्राचा अद्भुत नजारा पाहून भारावून जाल

SCROLL FOR NEXT