Crime News SaamTv
मुंबई/पुणे

Mumbai Crime : लालच बुरी बला है, एकाने गमावला जीव तर दोघांची जेल वारी

फसवणूक करण्याच्या डावात एकाने जीव गमावला तर, लालसेपोटी दोघांची जेल वारी नक्की

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सिद्धेश म्हात्रे

Mumbai Crime News : मुंबई गोवा महामार्गांवर ऑडी कार मध्ये संजय कारले या इसमाचा मृतदेह आढळला होता. या गुन्ह्याचा उलगडा करुन आरोपीला अटक करण्यात नवी मुंबई गुन्हे शाखेला तब्बल दीड महिन्यांनी यश आला आहे. कमी किंमतीत सोन देण्याचे लालच दाखवून फसवणूक करण्याचा प्रयत्न मृत संजय कारला याच्या जीवावर बेतल्याचे समोर आलं आहे.

मृत संजय कारला हा एक सऱ्हाईत गुन्हेगार असून आरोपी त्याच्या परिचयाचे होते. संजयने आरोपींना साडे सात लाखात 200 ग्राम सोनं देण्याचं आश्वासन दिल. संजयने त्यातले 5 लाख स्वीकारले. मात्र पुढील अडीच लाख स्वीकारण्यासाठी जेव्हा संजय आला त्यावेळी मात्र आरोपींनी प्रथम सोन देण्याची मागणी केली. यावर टाळाटाळ करत संजयने आरोपींना पिस्तूलचा धाक दाखवला.

त्यावेळी मात्र आरोपींनी संजयच्या हातातील पिस्तूल बळकावत त्याच्यावर 5 गोळ्या झाडल्या आणि गाडी मुंबई गोवा महामार्गांवर सोडून तेथून पळ काढला. हत्या केल्यावर आरोपी मोहसीन मुलाणी आणि अंकित कांबळे यांनी सातारा, बेंगलोर, जोधपूर, दिल्ली मार्गे नेपाळ गाठले आणि काही दिवसांनी पुणे गाठून आढावा घेऊन पुन्हा नेपाळला गेले. मात्र पोलिसांनी आरोपींचा तपास सुरूच ठेवला होता. दोन्ही आरोपी पुन्हा पुण्याला आले असता नवी मुंबई गुन्हे शाखेने आरोपींना ताब्यात घेत अटक केली.

एकूणच स्वस्त सोन्याचे आवेश दाखवून फसवणूक करण्याच्या डावात एकाने जीव गमावला तर स्वस्त सोन्याच्या लालसेपोटी दोघांची जेल वारी नक्की झाली आहे त्यामुळे बोलतातना लालच बुरी बला है ते अगदी खरं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाठीचार्जविरोधात ठाकरे बंधू मैदानात; मुंबईत 26 जुलैला ठाकरेंचा एल्गार

CJP Protest: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाहीच; CJP आंदोलनावर ठाम

Maharashtra Bandh: वंचित आघाडीचा महाराष्ट्र बंद; विद्यार्थ्यांसाठी प्रकाश आंबेडकर मैदानात

Railway Paper Leak: पेपर फोडणारेच जनता सेवकाच्या वेशात,माफिया मोकाटच

Medical Admission: वैद्यकीय प्रवेशात मॅनेजमेंट कोटा बंद; जागा अडवणाऱ्या विद्यार्थ्यांवर 2 वर्षांची बंदी

SCROLL FOR NEXT