Mumbai Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News : दारूच्या नशेत पोलिसांना मारहाण; नेव्ही, CISF जवानांसह चौघांना अटक

या प्रकरणातील चारही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : टॅक्सीचालकासह पोलिसांना (Mumbai) बेदम मारहाण करणाऱ्या चार आरोपींना मुंबई पोलिसांनी अटक केली. दोन दिवसांपूर्वी कफ परेड परिसरात चारही आरोपींनी टॅक्सीचालकाला बेदम मारहाण केली होती. गंभीर बाब म्हणजे टॅक्सीचालकाला वाचविण्यासाठी आलेल्या दोन पोलिसांनाही या आरोपींनी मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी (police) गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील चारही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. (Mumbai Police Todays News)

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये 2 नेव्ही आणि 2 CISF च्या जवानांचा समावेश आहे. कफ परेड परिसरात एका टॅक्सीचालकाला काही व्यक्ती मारहाण करत असल्याची माहिती कफ परेड पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी आरोपी प्रवीणकुमार अशोक सिंह(वय २७), चंद्रभान प्रताप सिंह (वय २६) व अभिजीतकुमार अजयबहादूर सिंह (वय ३०) हे चुन्नीलालला मारहाण करीत होते. पोलिसांनी या तिघांच्या तावडीतून चुन्नीलालची सुटका केली. त्यावेळी या तिघांनी पोलिसांनाही मारहाण करून धमकावले. (Mumbai Todays News)

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चारही आरोपी कफ परेडला भेट देण्यासाठी आले होते. दुपारी जेवण करून त्यांनी टॅक्सी भाड्याने घेतली. चारही आरोपी दारूच्या नशेत होते. नशेतच त्यांनी टॅक्सीचालकाला मारहाण केली.

इतकंच नाही तर, मदतीसाठी आलेल्या पोलिसांना देखील आरोपींनी बेदम मारलं. या मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटकही करण्यात आली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beauty Care Tips : चुकीचा फेसवॉश वापरताय! जाणून घ्या तुमच्या चेहऱ्यासाठी कोणता फेसवॉश योग्य

Chia Seeds Benefits: चिया सीड्सचे पाणी पिऊन कंटाळा आलाय? ट्राय करा खाण्याचे ७ चविष्ट अन् हेल्दी पर्याय

Maharashtra News Live Update: वंचितांचा आवाज म्हणून अण्णाभाऊ साठे यांनी मोलाचं कार्य केलं- देवेंद्र फडणवीस

Namo Shetkari Yojana : कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना 'नमो शेतकरी' योजनेचा लाभ मिळणार नाही? 56 लाख शेतकऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता

अहिल्यानगर हादरले! प्रिन्सिपलने ८ वर्षांच्या विद्यार्थ्याचा घेतला चावा; गळा दाबून २० सेकंद हवेत उचलले

SCROLL FOR NEXT