Mumbai Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime News : जन्मदात्या पित्याकडून अल्पवयीन मुलीवर २ वर्ष लैंगिक अत्याचार, आईच्या तक्रारीवरुन आरोपीला बेड्या

Mumbai News : आईच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी या नराधम पित्याला अटक करत गुन्हा दाखल केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन गाड

Mumbai Crime News :

मुंबईच्या गोवंडी परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिचे वडीलच गेल्या दोन वर्षांपासून लैंगिक अत्याचार करत असल्याचा संतापजन प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी या नराधम पित्याला अटक करत गुन्हा दाखल केला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्राथमिक माहितीनुसार, आपल्या अल्पवयीन मुलीवर तिच्या वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्याचं मुलीच्या आईच्या लक्षात आले. तिने मुलीला विचारलं तेव्हा हे सगळं गेल्या दोन वर्षांपासून सुरू असल्याचं तिने सांगितल. हे ऐकून आईला धक्काच बसला.

एवढे दिवस मुलगी का गप्प होती असं विचारलं असता या सगळ्याची बाहेर वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी वडिलांनी दिल्याचे मुलीने सांगितलं.

सगळा प्रकार समजताच आईने तात्काळ शिवाजीनगर पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांना या संदर्भात माहिती दिली. पोलिसांनी देखील एक क्षणही न दवडता तात्काळ गुन्हा दाखल केला आणि या नाराधम पित्याला ताब्यात घेतलं. (Latest Marathi News)

याप्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवर शिवाजीनगर पोलिसांनी बलात्कार आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पॉक्सो) कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. शनिवारी रात्री आरोपीला अटक करण्यात आली असून आज त्याला कोर्टात हजर केलं जाईल, अशी माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पालकमंत्री प्रकरणी मंत्री भरत गोगावले यांचा वरिष्ठांवर विश्वास

घरच्या घरी कसा बनवाल खुसखुशीत मालपुआ, पाहा अगदी सोपी पद्धत

Debit card lost: तुमचं डेबिट कार्ड हरवलंय? लगेच करा ही कामं

TMC-BJP Workers Clash: पंतप्रधान मोदींच्या रॅलीपूर्वी झाला मोठा राडा; तृणमूल काँग्रेस- भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, एकमेकांवर फेकले दगड

भारतीय नागरिकांना महागाईचा दुहेरी धक्का; एलपीजीनंतर पेट्रोल-डिझेल महागणार? कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT