Crime Saam tv
मुंबई/पुणे

फळचोरीच्या संशयावरून तरुणाला विवस्त्र करून मारहाण; अँटॉप हिल परिसरातील कथित व्हिडिओ व्हायरल

Antop Hill alleged assault viral video Mumbai : मुंबईतील सायन-कोळीवाडा येथील अँटॉप हिल परिसरात फळचोरीच्या संशयावरून एका तरुणाला विवस्त्र करून मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा दावा केला जात आहे.

Namdeo Kumbhar

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

Mumbai Crime News : मुंबईत सायन-कोळीवाडा येथील इंदिरानगर, अँटॉप हिल परिसरात फळचोरीच्या संशयावरून एका तरुणाला विवस्त्र करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा दावा केला जात असून, प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. मात्र, या घटनेची अद्याप स्वतंत्र पडताळणी झालेली नसून पोलिसांकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

उपलब्ध माहितीनुसार, फळचोरीचा संशय आल्याने संबंधित तरुणाला काही जणांनी पकडून विवस्त्र केले आणि अमानुष मारहाण केली, असा आरोप आहे. तसेच या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर प्रसारित केल्याचाही दावा केला जात आहे. एखाद्या व्यक्तीवर चोरीचा संशय असला, तरी कायदा हातात घेऊन अशा प्रकारे मारहाण करणे किंवा त्याचा अवमान करणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे या कथित घटनेची सत्यता तपासून दोषींवर कायदेशीर कारवाई होणार का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

रंजन जायस्वाल यांच्यावरही गंभीर आरोप

या प्रकरणासोबतच इंदिरानगर हाउसिंग सोसायटी परिसरातील रहिवासी रंजन जायस्वाल यांच्याविरोधातही काही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्या ताब्यात सुमारे ३०० अवैध हातगाड्या असून त्यावर जवळपास २५ जण काम करत असल्याचा दावा केला जात आहे. तसेच नवी मुंबईतील फळ बाजारातून चोरीची फळे आणून ती कमी दरात विकली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मात्र, या आरोपांचीही अद्याप स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.

अँटॉप हिल परिसरातील रस्ते आणि पदपथांवर बेकायदेशीरपणे चालणाऱ्या या हातगाड्यांना मुंबई महापालिकेच्या 'एफ/उत्तर' विभागातील काही अधिकाऱ्यांचे कथित पाठबळ असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. तथापि, या आरोपांवर संबंधित अधिकाऱ्यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

पोलीस व महापालिकेच्या कारवाईकडे लक्ष

या पार्श्वभूमीवर अँटॉप हिल पोलिसांनी कथित मारहाणीच्या व्हिडिओची सत्यता तपासून घटनेतील व्यक्तींची ओळख पटवावी, अशी मागणी जोर धरत आहे. तसेच फळचोरीच्या आरोपांची चौकशी करून नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट करावी, असेही नागरिकांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, मुंबई महापालिकेच्या 'एफ/उत्तर' विभागाने परिसरातील हातगाड्यांची पाहणी करून रस्ते व पदपथांवरील अतिक्रमणांवर नियमानुसार तात्काळ कारवाई करावी, असा मुद्दाही उपस्थित होत आहे.

दरम्यान, या प्रकरणी अँटॉप हिल पोलिसांची अधिकृत प्रतिक्रिया, गुन्हा दाखल झाल्याची माहिती किंवा संबंधित पक्षांची बाजू अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे पोलीस चौकशीनंतरच या सर्व प्रकरणाचा अधिकृत खुलासा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack Warning Signs: हार्ट अटॅक येण्यापूर्वी काही तास अगोदर त्वचा देते संकेत; चेहऱ्यावर दिसणारे हे 5 बदल ओळखा

Maharashtra News Live Update: नागपूर विमानतळावर महाराष्ट्र सुरक्षा बलच्या जवानाची नागरिकांना मारहाण

Diwali Cleaning Tips: दिवाळीच्या साफसफाईचं टेन्शन सोडा! वापरा या सोप्या 7 टीप्स, कमी वेळेत घर होईल स्वच्छ

Famous Actress : गुडन्यूज! प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, गोंडस बाळाला दिला जन्म; नाव काय?

पुन्हा तारीख पे तारीख! शिवसेना कुणाची? सुनावणी लांबणीवर; २३ नोव्हेंबरला होणार युक्तिवाद

SCROLL FOR NEXT