Mumbai Crime: प्रेयसीला म्हणाला शेवटचं भेटायला ये आणि दगा करत केला चाकू हल्ला... Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime: प्रेयसीला म्हणाला शेवटचं भेटायला ये आणि दगा करत केला चाकू हल्ला...

मुंबईत महिलेवर चाकुहल्ला केल्याची भयानक घटना घडली आहे. रेल्वे स्थानकावर बसलेल्या महिलेचा गळा चिरून पळ काढणाऱ्या आरोपीला वडाळा रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे

सूरज सावंत

मुंबई: मुंबईत महिलेवर चाकुहल्ला केल्याची भयानक घटना घडली आहे. रेल्वे स्थानकावर बसलेल्या महिलेचा गळा चिरून पळ काढणाऱ्या आरोपीला वडाळा रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. (Mumbai Crime News Knife Attack on women)

हार्बर लाईन, मुंबईच्या (Mumbai) डॉकयार्ड रोड स्टेशनवर १ जानेवारीच्या रात्री ही घटना घडली होती. ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये (CCTV) कैद झाली असून, फुटेजमध्ये आरोपी हा महिलेवर चाकुने हल्ला (Knife Attack) केल्याचं स्पष्ट दिसत आहे.

या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसतंय की, एक व्यक्ती स्टेशनवर बसलेल्या महिलेच्या जवळ बसतो आणि काही वेळ बोलतो. काही वेळाने तो तिथून उठतो आणि महिलेच्या जवळ जाऊन अचानक महिलेच्या मानेवर चाकू मारतो आणि पळून जातो. यावेळी महिलेसोबत एक लहान मुलंही होतं. घटनेनंतर रेल्वे स्थानकावर उपस्थित तिकीट बुकिंग क्लार्कने महिलेला तात्काळ रुग्णालयात नेले, या महिलेवर जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी (Police) मोहित महेंद्र आगडे (वय २३) याला अटक (Arrest) केली आहे. जखमी महिलाचे नाव काजल खान असून दोघंही लिव इन रिलेशनशीपमध्ये रहात होते. शेवटचे भेटण्यासाठी बोलावून त्याने रेल्वे स्थानकावर कोणी नाही हे पाहून महिलेवर हल्ला करत पळ काढला.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : यवतमाळच्या घाटंजी तालुक्यात 2 पूरबळी; यवतमाळ जिल्ह्याला पावसाने झोडपलं

'पप्पा मला अ‍ॅडमिशन घेऊन द्या ना'; पैशांअभावी वडिलांचा थांबण्याचा सल्ला; घरी कुणी नसताना लेकीनं आयुष्य संपवलं

Nashik News: नाशिकमध्ये धो धो! गोदामातेची पुरातच आरती, भक्तांची मांदियाळी|VIDEO

Skin Care Tips: पावसाळ्यात ग्लोइंग त्वचा हवीये, मग फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

Shubman Gill : शुभमन गिलकडून झाली मोठी चूक! भारताच्या कॅप्टनचा 'तो' व्हिडीओ लीक, बीसीसीआयला फटका बसणार?

SCROLL FOR NEXT