Mumbai Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: कर्जाचे आश्वासन देऊन व्यावसायिकाची लाखोंची फसवणूक; पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश, तिघांना अटक

Crime News: तांत्रिक मदत आणि गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी ठाणे परिसरातून नागरिकांना फोन करून फसवणूक करत असल्याची माहिती मिळताच तपास पथकाने ठाणे येथून या तीनही आरोपींना अटक केली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय गडदे

Mumbai Crime News:

कोटक महिंद्रा बँकेतून कर्ज मंजूर करून देण्याच्या नावाखाली अनेकांची फसवणूक करणाऱ्या तीन जणांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात वांद्रे बीकेसी पोलिसांना यश मिळाले आहे. दीपक बाबुला मुनी (26 वर्ष), मनीष सुधीर मगम (27 वर्ष) आणि पंकज सभाजीत यादव तेवीस वर्ष अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बीकेसी (BKC) पोलिसांनी या तिघांना ठाणे येथून अटक केली असून त्यांच्याकडून 19 मोबाईल, एक लॅपटॉप, विविध बँकांची क्रेडिट व डेबिट कार्ड तसेच विविध बँकांचे पासबुक आणि चेक बुक देखील जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले असून या तीनही आरोपींना 13 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे पूर्व परिसरात राहणारे व्यावसायिक अश्विन अँथोनी किन्नी यांना फेब्रुवारी 2023 पासून आतापर्यंत विविध मोबाईल आणि जीमेलच्या माध्यमातून संपर्कसाधून कोटक महिंद्रा फायनान्स कंपनीतून स्वस्तात कर्ज मंजूर करून देण्याचे आश्वासन देत प्रोसेसिंग फी म्हणून दोन लाख 66 हजार पाचशे पाच रुपये इतके पैसे कळले. मात्र किन्नी यांना कोणत्याही प्रकारे कर्जाची रक्कम मिळाली नाही.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच किन्नी यांनी बीकेसी पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात तक्रार दिली. या तक्रारीनुसार बीकेसी पोलिसांनी 419, 420, 465, 468, 471, 34 भादविसह आयटी कलम 66 (क) (ड) नुसार गुन्हा नोंद केलाय. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बीकेसी पोलीस ठाण्याचे व पो नि रघुनाथ कदम यांनी तपासासाठी पोलीस निरीक्षक गवळी पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ गरड, नेर्लेकर पोलीस हवालदार धोत्रे, चव्हाण आणि पोलीस शिपाई गायकवाड यांचे पथक नेमून तपासास सुरुवात केली.

तांत्रिक मदत आणि गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी ठाणे परिसरातून नागरिकांना फोन करून फसवणूक करत असल्याची माहिती मिळताच तपास पथकाने ठाणे येथून या तीनही आरोपींना अटक केली. ठाणे परिसरातून हे तीनही आरोपी नागरिकांना विविध मोबाईल्स फोनच्या माध्यमातून कॉल करून किंवा जीमेल करून कोटक महिंद्रा फायनान्स कंपनीतून स्वस्तात लोन उपलब्ध करून देण्याचे अमित दाखवत त्यासाठी बनावट लोन अलॉटमेंट लेटर देखील देण्याचे काम करत होते आणि प्रोसेसिंग फी म्हणून आणि फिटनेस यांना चहापाणी म्हणून लाखो रुपये उकळत असे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT