Aslam Shaikh Death Threat - Saam Tv
मुंबई/पुणे

Aslam Shaikh News: 'दोन दिवसांत उडवणार', माजी मंत्री अस्लम शेख यांना जीवे मारण्याची धमकी

Aslam Shaikh Death Threat: 'दोन दिवसांत उडवणार', माजी मंत्री अस्लम शेख यांना जीवे मारण्याची धमकी

Satish Kengar

>> संजय गडदे

Aslam Shaikh Death Threat News:

माजी मंत्री आणि काँग्रेसचे मालाड मालवणी विधानसभेचे आमदार अस्लम शेख यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. अस्लम शेख यांना 5 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजता मोबाईल फोनवर एक कॉल आला आणि दोन दिवसात आमदार अस्लम शेख यांना उडवून देण्याची धमकी दिली.

धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःची ओळख गॅंगस्टर गोल्डी ब्रार म्हणून सांगितली आहे. हा फोन अस्लम शेख यांचे पीए विक्रम कपूर नावाच्या व्यक्तीने उचलला.

धमकी दिल्यानंतर विक्रम कपूर यांनी बांगूर नगर पोलीस ठाण्यात धमकी देणाऱ्या व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल केला आहे.  (Latest Marathi News)

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा फोन कॅनडातून आला होता. सध्या बांगूर नगर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अस्लम शेख यांना जीवे मारण्याची धमकी मिल्यानंतर त्यांच्या सुसरक्षेत वाढ केली जैनयाची शक्यता आहे.

गोल्डी ब्रार हा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई यांच्या अत्यंत जवळचा असून सध्या तो फरार आहे. त्यामुळे गोल्डी ब्रार पोलिसांच्या रडारवर आहे यापूर्वी गोल्डी याने बॉलीवूड स्टार सलमान खान यालाही जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणीही पोलीस तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actress : 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीनं दिली प्रेमाची कबुली, होणारा नवरा आहे तरी कोण? पाहा रोमँटिक PHOTOS

Panchang Today: मंगळवारी मघा नक्षत्र व शोभन योग; आज कोणत्या राशींना मिळणार यश?

Gold Rate Today: खुशखबर! सलग पाचव्या दिवशी सोनं झालं स्वस्त; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Maharashtra Live News Update : एकनाथ शिंदेंच्या सभेसाठी कुडाळमध्ये जय्यत तयारी

Mumbai Traffic New Rules: काय सांगता! मुंबईत अवजड वाहनांना बंदी, वाहतुकीचे नवीन नियम काय आहेत?

SCROLL FOR NEXT