Mumbai Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: सायन रेल्वे स्थानकावर जोडप्याची तरूणाला मारहाण, रुळावर पडताच लोकलने उडवलं; नेमकं काय घडलं?

Mumbai Local Train News: सायन रेल्वे स्थानकावर जोडप्याची तरूणाला मारहाण, रुळावर पडताच लोकलने उडवलं; नेमकं काय घडलं?

साम टिव्ही ब्युरो

>> सचिन गाड

Mumbai Crime News: सायन रेल्वे स्थाकावर एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे रेल्वे फलाटावर महिलेला एका तरुणांचा धक्का लागल्याने महिलेने पतीसह मिळून त्याला मारहाण केली. या मारहाणीत तरुण रेल्वे रुळावर पडला. त्याच वेळी रुळावर आलेल्या रेल्वेने तरूणाला धडक दिली, ज्यात त्याचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, सायन रेल्वेस्थानकावर दिनेश राठोड (वय २६) नावाच्या तरुणांचा महिला प्रवाशाला धक्का लागला. शीतल माने असं या महिलेचं नाव आहे. धक्का लागताच शीतलने दिनेशला छत्रीने मारहाण केली.

दोघांमध्ये होत असलेली बाचाबाची बघता थोड्या अंतरावर उभा असलेला महिलेचा पती अविनाश माने देखील आला आणि त्याने दिनेशला मारहाण करण्यास सुरुवात केली. ज्यात दिनेश रेल्वे रुळावर पडला. (Latest Marathi News)

रुळावर पडल्यानंतर दिनेश स्वतःला सावरत असतानाच दुर्दैवाने माटूंग्यावरून आलेल्या लोकलने त्याला उडवलं. यानंतर गंभीर जखमी झलेल्या दिनेशला रुग्नालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर अविनाश माने आणि त्याची पत्नी शीतल हिला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना सदोष मनुष्यवध केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT