Borivali News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: मैत्रिणीला खूश करण्यासाठी रोज नविन अ‍ॅक्टिव्हा करायचा चोरी, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Mumbai News: मैत्रिणीला खूश करण्यासाठी रोज नविन अ‍ॅक्टिव्हा करायचा चोरी, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

साम टिव्ही ब्युरो

>> संजय गडदे

Mumbai Crime News: बोरिवली पोलिसांनी अशा एका भ्याड स्कूटी चोराला अटक केली आहे. जो काही मिनिटांत स्कूटी चोरून पळून जायचा. बोरिवली पोलिसांनी आरोपींकडून 6 स्कूटी जप्त केल्या आहेत. प्रेयसीला खूश करण्यासाठी आरोपी रोज नवीन अ‍ॅक्टिव्हा चोरायचा.

चोरी केलेली अ‍ॅक्टिव्हा घेऊन तो आपल्या मैत्रिणी सोबत मौज करत होता. जिथे स्कूटीचे पेट्रोल संपायचे. तो स्कूटी तिथेच सोडून दुसरी स्कूटी चोरून पळून जायचा. अनिल भीमराव निंबाळकर (23 वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

बोरीवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्कूटी चोरीच्या घटना वाढत होत्या. बोरिवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून स्कूटीचा तपास सुरू केला. सीसीटीव्ही आणि सूत्रांच्या मदतीने आरोपी मालाड परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. (Latest Marathi News)

त्यानंतर बोरिवली पोलिसांचे पथक तयार करून आरोपीला मालाड येथून अटक करण्यात आली. त्याच्याकडून 6 अ‍ॅक्टिव्हा जप्त करण्यात आल्या.

बोरिवली पोलिसांनी बोरिवली, दहिसर, चारकोप आणि कस्तुरबा येथे 6 गुन्हे शोधले आहेत. अनिल भीमराव हा मालवणी येथील रहिवासी असून मेकॅनिकचे काम करतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील प्रमुख रस्त्यावरील वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Daily Habits: तुम्हीही नकळत करताय या चुका? शरीरावर होऊ शकतो गंभीर परिणाम, आजच बदला सवयी

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये विराज प्रोफाइल कंपनीविरोधात आदिवासींचं बेमुदत धरणे आंदोलन; प्रकल्प रद्द करण्याची मागणी

SBI Data Leak : SBI च्या खातेधारकांना मोठा धक्का, नाव, नंबर अन् पत्ता... ग्राहकांची संपूर्ण माहिती डार्क वेबवर लीक

Car Accident: काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याच्या कारचा चक्काचूर; मुंबई-नागपूर हायवेवर भरधाव ट्रकची धडक, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT