Mumbai News  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime News : मुंबई पोलीस दलातील 'ते' पत्र खोटं; वरिष्ठांकडून लैंगिक अत्याचाराचे आरोप महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी फेटाळले

Mumbai Police News : मुंबई पोलिसांच्या मोटर परिवहन विभागातील महिला पोलीस शिपाई चालकांवर बलात्कार झाल्याचे आरोप करण्यात आले होते. मात्र आठही महिला पोलीस शिपायांनी हे आरोप फेटाळले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय गडदे

Mumbai News :

मुंबई पोलीस दलातील परिवहन विभागातील ८ महिला पोलीस कर्मचाऱ्यांवर तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अत्याचार केल्याचा दावा केला जात होता. मात्र असा कोणताही प्रकार घडला नसल्याची बाब समोर आली आले.

मुंबई पोलिसांच्या मोटर परिवहन विभागातील महिला पोलीस शिपाई चालकांवर बलात्कार झाल्याचे आरोप करण्यात आले होते. मात्र आठही महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी हे आरोप फेटाळले आहेत. त्यांच्यासोबत कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचं तसेच अशी कोणतीही तक्रार न केल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मोटार परिवहन विभागात काम करणाऱ्या ८ महिला पोलीस शिपायांवर ३ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून मागील अनेक दिवसांपासून वारंवार बलात्कार केला जात होता, अशा आशयाचं पत्र व्हायरल झालं होतं. (Crime News)

आपल्या नावाचा गैरवापर केल्याचा महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोप केला आहे. मोटर परिवहन विभागातील पोलीस उपायुक्त तसेच दोन पोलीस निरीक्षकांनी आणि त्यांच्या हाताखालील कर्मचाऱ्यांनी बलात्कार तसेच गर्भपात केल्याचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच मुंबई पोलीस आयुक्तांना देखील हे पत्र पाठवण्यात आल्याची बोललं जात होते. मुंबई पोलिसांनी आता याबाबत चौकशी सुरु केली आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या नावाचा गैरवापर करून बनावट पत्र नेमकं कोणी पाठवलं आणि त्या मागच्या उद्देशाची चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

School Shut Down : शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणारा अहवाल! ९२,००० शाळांना टाळं; कारणे आली समोर

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याने एकाच चित्रपटात साकारल्या तब्बल १६५ भूमिका, सिनेमा तुम्ही पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT