Mumbai Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News : मानखुर्दमध्ये 32 वर्षीय महिला पोलीस कॉन्स्टेबलची आत्महत्या, सुसाईड नोटही सापडली

Mumbai Women Police Constable : मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर येथील राहत्या घरी महिला पोलीस कॉन्स्टेबलने गळफास घेतला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन गाड

Mumbai News :

मुंबईतील मानखुर्द येथे एका 32 वर्षीय महिला पोलीस कॉन्स्टेबलने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर येथील राहत्या घरी महिला पोलीस कॉन्स्टेबलने गळफास घेतला.

वर्षा शिंदे असं मृत पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे. त्या ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक सुसाईड नोट देखील लिहून ठेवली आहे. यामध्ये त्यांनी पती आणि सासरच्यांवर गंभीर आरोपी लावले आहेत. ट्रॉम्बे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत तपास सुरू केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, वर्षा शिंदे या गेल्या दीड वर्षांपासून ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या. मात्र मंगळवारी सकाळी त्यांनी अचानक टोकाचा निर्णय घेत जीवन संपवलं. घटनेची माहिती मिळताच त्यांचे कुंटुबिय गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल झाले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

वर्षा शिंदे यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिल्याप्रमाणे कौटुंबिक वादामुळे त्या अस्वस्थ होत्या. सततच्या वादाला कंटाळूनच त्यांनी मृत्यूला कवटाळलं असल्याची प्राथमिक अंदाज पोलिसांनी दिली आहे. ट्रॉम्बे पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जगाला सध्या भारताची आवश्यकता: मोहन भागवत

नगरसेविका रेखा यादव यांच्याकडे दोन रेशन कार्ड, 3 मतदान कार्ड; काँग्रेसची चौकशीची मागणी

Team India : भारतीय विकेटकीपर-फलंदाजाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियात केलं होतं पदार्पण

Belly Fat Loss Exercise: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी करा हे सोपे व्यायाम; घरच्या घरी मिळवा फिट आणि सडपातळ शरीर

Silver Jodavi Design: वटपौर्णिमेसाठी खरेदी करा खास या ७ नव्य डिझाइन्सची सिल्व्हर जोडवी

SCROLL FOR NEXT