Mumbai Crime News 20-year-old girl physically assaulted a School boy Chembur area Shocking incident  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: मुंबई हादरली! २० वर्षीय तरुणीकडून अल्पवयीन मुलावर अत्याचार; चेंबुरमधील धक्कादायक घटना

Mumbai Chembur Crime News: १५ वर्षीय अल्पवयीन मुलाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्यावर एका तरुणीने वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार चेंबूरमध्ये घडला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai Chembur Crime News: मुंबईच्या चेंबूर परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. १५ वर्षीय अल्पवयीन मुलाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्यावर एका तरुणीने वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार चेंबूरमध्ये घडला आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात २० वर्षीय तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी तरुणीला अटक केली आहे. (Latest Marathi News)

या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, १५ वर्षीय पीडित मुलगा आणि २० वर्षीय आरोपी तरुणी एकाच परिसरात राहतात. काही दिवसांपूर्वी दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर तरुणीने अल्पवयीन मुलाला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं.

इतकंच नाही, तर त्याच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार (Crime News) देखील केले. दरम्यान, महिनाभरापूर्वी मुलगा आणि तरुणी दोघेही गायब झाले होते. याबाबत मुलाच्या कुटुंबियांना कळताच त्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून पोलीस दोघांचाही शोध घेत होते.

दरम्यान, पोलिसांनी दोघांचेही मोबाईल लोकेशन चेक केले असता, ते चेन्नईमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार टिळकनगर पोलिसांचं एक पथक चेन्नईला रवाना झालं. तेथून पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलं. याप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या आई-वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २० वर्षीय तरुणीवर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात तरुणीकडून अल्पवयीन मुलावर अत्याचार

अल्पवयीन मुलावर तरुणीने जबरदस्ती अत्याचार केल्याची गेल्या आठवडाभरातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी पुण्यात देखील अशीच घटना घडली होती. शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलाला धमकावून एका २८ वर्षीय तरुणीने त्याच्यावर अत्याचार केला. तरुणीने मुलाला जाळ्यात ओढून माझ्याशी संबंध ठेव नाहीतर तू माझ्यावर बलात्कार केला, अशी तक्रार पोलिसांकडे देईल, अशी धमकी अल्पवयीन मुलाला दिली होती. याप्रकरणी कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT