Versova Crime News Today Saam TV
मुंबई/पुणे

Versova Crime News: लग्नाआधी शरीरसंबंध ठेवण्यास तरुणीचा नकार; संतापलेल्या तरुणाचं भयानक कृत्य, मुंबईतील घटना

Mumbai Crime News: शरीरसुखाची मागणी नाकारल्याच्या रागातून एका १८ वर्षीय तरुणीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. मुंबईच्या वर्सोवा परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Satish Daud

संजय गडदे, साम टीव्ही

Versova Crime News Today: गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिला अत्याचाराच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. प्रेमसंबंध तसेच लग्नाचे वचन देऊन महिलांवर अत्याचार झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहे. अत्याचाराला विरोध केल्यानंतर आरोपींकडून मारहाणीच्या घटनाही घडत आहेत. अशाच काहीसा प्रकार मुंबईतून समोर आला आहे.

शरीरसुखाची मागणी नाकारल्याच्या रागातून एका १८ वर्षीय तरुणीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. मुंबईच्या वर्सोवा परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यानुसार, पोलिसांनी २६ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, वर्सोवा परिसरात राहणाऱ्या १८ वर्षीय तरुणीचं २६ वर्षीय तरुणासोबत लग्न होणार होतं. दोघांच्या लग्नाची घरात बोलणी सुरू होती. त्याचवेळी मित्राच्या रूमवरून सामान आणण्याच्या बहाण्याने आरोपी तरुणाने तरुणीला फोन करून बोलावून घेतलं.

दरम्यान, तरुणी रूमवर आल्यानंतर आरोपीने तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुणीने या सर्व गोष्टीला विरोध केला. त्यामुळे रागाच्या भरात आरोपी तरुणाने तिला बेदम मारहाण केली.

इतकंच नाही, तर उशीने तरुणीचं तोंड दाबत तिला जीवे मारण्याचा देखील प्रयत्न केला. याप्रकरणी वर्सोवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपी तरुणाचा शोध घेत आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT