mumbai crime news  saam tv
मुंबई/पुणे

मुंबईतील धक्कादायक घटना; २४ मजली इमरातीच्या टेरेसवर जाऊन मुलीने आयुष्य संपवलं

मुंबईतील २४ मजली इमारतीच्या टेरेसवर १५ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सूरज सावंत

Mumbai Crime News : मुंबईतून (Mumbai) धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. मुंबईतील २४ मजली इमारतीच्या टेरेसवर १५ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. शनिवारी सकाळी सदर घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी (Police) अपमृत्यूची नोंद केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रिया वैभव ठाकूर असे आत्महत्या केलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे नाव आहे. रिया प्रभादेवीत कामगार नगर सेन्चुरी म्हाडा इमारतीत पालकांसोबत राहत होती. शनिवारी सकाळी सव्वा १० वाजण्याच्या सुमारास रिया ही इमारतीच्या टेरेसवर गेली. टेरेसवर जाऊन रियाने ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर इमारतीतील नागरिकांना तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर इमारतीत एकच खळबळ उडाली.

इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशी लोकांनी तातडीने घटनेबाबत पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलीस माहिती मिळताच घटनास्थळी हजर झाले. पोलिसांनी रियाला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले. रियाने आत्महच्या का केली, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी याप्रकरणी ना म जोशी मार्ग पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद केली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पालकमंत्री जयकुमार गोरेंची ऊसतोड कामगारांसोबत दिवाळी! चिमुकल्यांना स्वतःच्या हाताने घातले नवे कपडे

Political News : शिंदेसेनेच्या नेत्याची पंतप्रधान मोदींवर टीका, नेमकं काय म्हणाले?

EPFO WhatsApp Service : फक्त 'Hi' मेसेज करा अन् PF खात्यात किती पैसे आहेत ते जाणून घ्या! EPFO ची भन्नाट सुविधा

Papia Adhikari: फटाके फोडल्याने आजार बरे होतात; भाजप आमदाराच्या अजब विधान

Ankle Sprain Remedies : पाय मुरगळला किंवा मुका मार लागलाय? 'हा' १ सोपा घरगुती उपाय करा, सूज अन् वेदना मिनिटांत गायब

SCROLL FOR NEXT