MUMBAI VIKHROLI MINOR GIRL ASSAULT CASE BAKERY OWNER ARRESTED UNDER POCSO Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai : मुंबई हादरली! १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार; बेकरी मालकाचं भयंकर कृत्य

Mumbai Vikroli Crime News : मुंबईतील विक्रोळी येथे १३ वर्षीय मुलीवर बेकरी मालकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Alisha Khedekar

  • विक्रोळीमध्ये १३ वर्षीय मुलीवर अत्याचाराची घटना

  • आरोपी बेकरी मालकाला पोलिसांनी अटक केली

  • वैद्यकीय तपासणीत मुलगी गरोदर असल्याचे उघड

  • पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल, तपास सुरू

मुंबईतील विक्रोळी परिसरातून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका बेकरी मालकाने खाऊचं आमिष दाखवून १३ वर्षाच्या मुलीवर ३ ते ४ वेळा बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बेकरी मालक नफिस अहमद अब्दुल रहमान उर्फ सलमानला अटक करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पालकांनी संताप व्यक्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नफिस अहमद अब्दुल रहमान उर्फ सलमान हा पार्कसाईट परिसरात बेकरी चालवतो. पीडित मुलगी ही त्या बेकरीत खाऊ घेण्यासाठी अनेकदा जात होती. याच ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने मुलीला भुरळ घालत बेकरीच्या मागील घरात नेले आणि तिच्यावर तीन ते चार वेळा बलात्कार केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर आरोपीने मुलीला जीवे मारण्याची धमकी देत हा प्रकार कोणालाही सांगू नये, असे बजावले होते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुलीच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्यानंतर तिच्या पालकांनी तिला तातडीने डॉक्टरांकडे नेले. वैद्यकीय तपासणीदरम्यान मुलगी गरोदर असल्याचे स्पष्ट झाले आणि संपूर्ण प्रकार उघडकीस आला. ही बाब समजताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्यानंतर मुलीला तात्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पार्कसाईट पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

आरोपीविरोधात पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास केला जात असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या घटनेमुळे मुलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT