Mumbai Crime News SAAM TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime: मुंबई हादरली! बायकोच्या चारित्र्यावर संशय घेत नवऱ्याचं भयंकर कृत्य! गाठला कृरतेचा कळस

Mumbai Crime: पत्नी घरी नसताना आरोपीने राहत्या घरी ११ वर्षीय मुलगी आर्याला गळफास लावून तिची हत्या केली.

सुरज सावंत

Mumbai Crime News: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत मुलीची हत्या करून पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लालबाग परिसरात उघडकीय आली आहे. भुपेष पवार आणि आर्या पवार अशी मृतांची नाव आहेत. भूपेष यांनी आधी मुलीची हत्या केली आणि नंतर स्वत: गळफास लावून आत्महत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, भुपेष हे त्यांच्या पत्नीवर नेहमी संशय घ्यायचे. यातूनच भूपेष यांनी मंगळवारी त्यांची पत्नी घरी नसताना राहत्या घरी ११ वर्षीय मुलगी आर्याला गळफास लावून तिची हत्या केली. त्यानंतर त्यांनी स्वत:गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याधी त्यांनी एक चिठ्ठी देखील लिहिली आहे.

या प्रकरणी काळाचौकी पोलिस ठाण्यात पत्नीच्या तक्रारीवरून भूपेष विरोधात कलम ३०२ भादवी हत्येचा गुन्हा (Mumbai Crime) दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी सांगितले की, आरोपी भूपेष (ज्याचा मृत्यू झाला आहे) हा शेअर ब्रोकर म्हणून काम करायचा आणि त्याची पत्नी डेटा ऑपरेटर म्हणून काम करते.

पोलिसांना घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही मिळाली आहे. त्यात आरोपीने घरातले सोन्याचे दागिने, पैसे आणि घर माझ्या पुतण्याला द्या असे लिहिले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी पतीने घरातून 9-10 तोळे सोने आणि 9 लाख रुपये रोख काढून जमिनीवर ठेवले होते आणि सुसाईड नोटमध्ये पुतण्याला देण्याचे सांगितले होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. (Latest Marathi News)

Edited By - Chandrakant Jagtap

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT