Mumbai Crime: डोक्यात खलबत्ता मारून २९ वर्षीय मुलीची हत्या साम टिव्ही
मुंबई/पुणे

Mumbai Crime: मुंबईत डोक्यात खलबत्ता मारून २९ वर्षीय मुलीची हत्या

सूरज सावंत

मुंबई : मुंबईच्या साकीनाका परिसरात २९ वर्षीय मुलीची डोक्यात खलबत्ता टाकून आणि गळ्यावर चाकूने वार करत हत्या (Homicide) केल्याची घटना समोर आली आहे. मनीषा जाधव असे या मुलीचे नाव असून गुरूवारी मध्यरात्री १ च्या सुमारास साईबाबा मंदीराजवळ संघर्षनगर, चांदिवली येथे जखमी अवस्थेत पडली असल्याची माहिती पोलिसांना (Police) मिळाली. (Mumbai Crime Homicide of Young Girl at Ghatkopar)

घटनेची माहिती मिळतच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मनिषा हिला तातडीने उपचारासाठी जवळील घाटकोपरच्या (Mumbai) राजावाडी रुग्णालयात नेले. मात्र, उपचारा दरम्यान मनिषाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मनिषा ही मागील ३ वर्षापासून तिचा मित्र राजू निळे (४२) याच्याबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहात होती.

राजू पहिल्या पत्नीला भेटायला गेला हे समजल्यानंतर मनिषा आणि राजू यांच्यात वाद झाले. त्याच वेळी रागातून राजूने मनिषाला मारहाण केली. तपासात राजूनेच खलबत्याच्या राॅडने मनिषाला मारहाण केल्याचे तपासात समोर आले आहे.

राजू हा टिव्ही दुरूस्तीचे काम करत असून मनिषा ही घरकाम करत असल्याची माहित पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी राजूला अटक केली असून साकीनाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हे देखिल पहा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मूलभूत सुविधांसाठी बुलढाण्यात आदिवासींचा एल्गार

६ ते १० ऑक्टोबरदरम्यान पाऊस अन् बर्फवृष्टीचा इशारा; महाराष्ट्रासह अनेक राज्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट

Matheran : गाड्यांचा हॉर्न नाही, फक्त निसर्गाची शांतता! माथेरानमध्ये फिरताना 'ही' ७ ठिकाणं पाहायला विसरू नका

Pati Patni Aur Panga 2 Set Fire: 'पती पत्नी और पंगा २'च्या सेटवर भीषण आग; 'हसल ५'चाही सेटही आगीच्या विळख्यात

Sitafal khanyache Fayde: सिताफळ खाण्याचे 7 आरोग्यदायी फायदे कोणते?

SCROLL FOR NEXT