Mumbai Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime: मुंबई हादरली! १० जणांकडून नवरा-बायको अन् मुलीवर जीवघेणा हल्ला, लाथाबुक्क्या अन् काठ्यांनी मारहाण

Firecracker Dispute Turns Violent in Andheri: अंधेरीमध्ये फटाके फोडण्यावरून नवरा-बायको आणि मुलीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झालेत.

Priya More

संजय गडदे, मुंबई

मुंबईमध्ये फटाके फोडण्यावरून तुफान राडा झाला. अंधेरी पूर्वेत फटाके फोडण्याच्या वादातून कुटुंबावर गुंडांच्या टोळीकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला. अंधेरी पूर्वेतील मरोळ भागामधील कृष्णानगर परिसरात ही घटना घडली. फटाके फोडण्याच्या वादातून पती-पत्नी आणि मुलीवर हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. दिवाळीनिमित्त गल्लीत मोकळ्या जागेत फटाके फोडणाऱ्या लहान मुलीला गुंड टोळीकडून विरोध करण्यात आला. यावरून झालेल्या वादातून कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात गोंधळाचे वातावरण होते.

फटाके फोडण्यास विरोध करत बादल गोस्वामी आणि त्याच्या साथीदारांकडून गुप्ता कुटुंबीयांना शिवीगाळ करण्यात आली. सुरूवातीला शाब्दिक बाचाबाची झाली त्यानंतर या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. ८ ते १० जणांच्या टोळीकडून गुप्ता कुटुंबीयांवर हल्ला करण्यात आला. महिलेला जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी आणि काठीने बेदम मारहाण करण्यात आली. पत्नीला वाचवण्यासाठी धावलेल्या पतीलाही टोळीकडून लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण करण्यात आली.

या हल्ल्यात पती-पत्नी आणि त्यांची लहान मुलगी गंभीर जखमी झाली. तिन्ही जखमींना जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तिघांची प्रकृती गंभीर असून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. एमआयडीसी पोलिसांकडून ८ ते १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या टोळीचा प्रमुख बादल गोस्वामी याच्यासह धर्मेंद्र राजभर, जितेंद्र राजभर आणि श्याम नारायण गुप्ता या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली.

या हल्ल्यात सहभागी असलेल्या अन्य फरार आरोपींचा एमआयडीसी पोलिसांकडून शोध सुरू आहे. बादल गोस्वामी टोळीवर हिंदुत्वाच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांना धमकावणे आणि मारहाण केल्याचे आरोप आहेत. मागील काही महिन्यांपासून अंधेरी पूर्व परिसरात या टोळीकडून दहशत निर्माण केली जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. या टोळीविरोधात अंधेरी पूर्वेतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली. टोळीच्या वाढत्या दहशतीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बादल गोस्वामी टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्याची नागरिकांनी मुंबई पोलिसांकडे मागणी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील सिंहगड शिक्षण संस्थेची CBI आणि ED मार्फत चौकशी होणार

Rain Alert : धो धो पाऊस कोसळणार! १५ राज्यांना पावसाचा इशारा; ताशी ७० च्या वेगाने वारे वाहणार

Thursday Horoscope : आज या ४ राशींचं नशीब चमकणार! अचानक मिळणार आनंदाची बातमी; वाचा आजचे भविष्य

महाराष्ट्र हादरला! एकाच कुटुंबातील ८ चिमुकल्यांना विषबाधा, एका मुलीचा मृत्यू, ७ गंभीर, नेमकं काय घडलं?

NCP Merger : सुनेत्रा पवारांचं विलिनीकरणावर सूचक विधान, नेमका अर्थ काय?

SCROLL FOR NEXT