Mumbai Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime: मुंबई हादरली! कॉलेजच्या नाईट पार्टीत तरुणीवर बलात्कार, छत्तीसगडमधून आरोपीला बेड्या

Mumbai Police: मुंबईमध्ये तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. कॉलेज पार्टीदरम्यान आरोपीने तरुणीसोबत भयंकर कृत्य केले.

Priya More

संजय गडदे, मुंबई

मुंबईतील मालाड पश्चिमेकडील मढ आयलंड परिसरात कॉलेज विद्यार्थ्यांच्या नाईट पार्टीदरम्यान एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पार्टीदरम्यान तरुणीच्या पेयामध्ये गुंगीचे औषध मिसळण्यात आले. बेशुद्धावस्थेत आरोपीने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी जुहू पोलिसांनी गुन्हा दाखल करत मुख्य आरोपीला छत्तीसगडमधून अटक केली आहे. या घटनेमुळे मुंबई हादरली.

मिळालेल्या माहितीनुसार, विलेपार्ले येथील एका नामांकित कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या ग्रुपने २९ ऑक्टोबर रोजी मढ आयलंड परिसरातील एका खासगी रिसॉर्टमध्ये नाईट पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये पीडित तरुणीदेखील सहभागी झाली होती. यावेळी आरोपीने तरुणीच्या ड्रिंकमध्ये नशेचा पदार्थ मिसळल्याचा आरोप आहे. हे पेय प्यायल्यानंतर तरुणीला गुंगी येऊ लागली आणि ती शुद्ध हरपण्याच्या अवस्थेत गेली. याच परिस्थितीचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे.

पालकांना सांगितल्यानंतर प्रकरण उघडकीस -

या घटनेनंतर घाबरलेल्या तरुणीने आपल्या पालकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पालकांनी तिला सोबत घेऊन पोलिसांकडे धाव घेतली. घटना मढ आयलंड परिसरात घडल्याने मालवणी पोलीस ठाण्यात झिरो एफआयआर दाखल करण्यात आली. पुढील तपासासाठी हे प्रकरण जुहू पोलीस ठाण्याकडे सोपवण्यात आले.

छत्तीसगडमधून आरोपीला अटक -

गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्य आरोपी मुंबईतून फरार झाला होता. तो छत्तीसगडमधील आपल्या मूळ गावी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तांत्रिक तपास आणि सर्व्हेलन्सच्या आधारे जुहू पोलिसांच्या पथकाने छत्तीसगडमध्ये छापा टाकून आरोपीला अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणातील एफआयआरमध्ये आणखी एका संशयिताचे नाव समोर आले आहे. मात्र, संबंधित व्यक्तीचा अत्याचाराच्या घटनेत प्रत्यक्ष सहभाग असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास जुहू पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bottle Cleaning Tips: पाणी पिण्याची बाटली स्वच्छ कशी करायची? जाणून घ्या सोप्या टिप्स

Maharashtra News Live Update: मालवण मसुरे येथे भीषण आग; घरासह पाच वाहने जळून खाक

Konkani Tilachi Chutney Recipe : थंडीत जेवणाची रंगत वाढवेल कोकण स्पेशल तिळाची चटणी, गरमागरम भाकरीसोबत खाण्याची मजा काही औरच

Gold Rate Today : गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, १ तोळ्याची आजची किंमत किती? वाचा 18k ,22k, 24k चे दर

Mumbai Railway Station: हा महाराष्ट्र आहे की बिहार? मुंबईतील रेल्वे स्थानकांवर वाजली भोजपुरी गाणी, मुंबईकर संतापले; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT