Mumbai Police Arrested culprit saam tv
मुंबई/पुणे

बॉम्बस्फोट करून भारतात हाहाकार माजवणार, धमकी देणाऱ्याच्या मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या

मुंबईतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे.

सूरज सावंत

मुंबई : येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देईल, अशी धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (२५) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपी सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे. (Mumbai police arrested culprit giving bombing threat)

मिळालेल्या माहितीनुसा, आरोपी सहानीने व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल करून बॉम्बस्फोटाची धमकी दिली होती. त्याने हैद्राबादमधून कॉल केला होता. कॉल केल्यानंतर तो ट्रेनमध्ये चढला आणि मुंबईच्या दिशेने निघाला. तो मुंबईत (Mumbai) पोहोचताच त्याचा शोध घेण्याचे काम (Mumbai Crime Branch) गुन्हे शाखेने सुरू केले. मोबाइल लोकेशनच्या मदतीने सहानीला दक्षिण मुंबईतील चर्नीरोड परिसरातून अटक करण्यात आली.

सहानीने सांताक्रूझ येथे राहणाऱ्या रफत हुसेन नावाच्या व्यक्तीला व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल केला आणि त्याला ‘बॉम्बस्फोट करना है इंडिया में विनाश है’ असे सांगितले.या फोन कॉलनंतर तक्रारदार, जो राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे, त्याने मुंबई पोलिसांना माहिती दिली.या माहितीच्या आधारे पोलिसांनी तक्रार घेऊन व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम ५०६(२) अन्वये गुन्हा दाखल केला.गुन्हे शाखा या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT