MOHAMMAD KHATIB FRAUD CASE: PUNE PSI SANJAY JADHAV ARRESTED BY MUMBAI CRIME BRANCH Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai : बोगस DCP ला करायचा मदत, मुंबईत PSI ला बेड्या, चोर-पोलिसाचं बिंग असं फुटले

Mumbai Crime News : मोहम्मद खतिब उर्फ राज खतिब फसवणूक प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत पुण्यातील PSI संजय जाधवला अटक केली आहे. 10 लाखांच्या फसवणुक केल्या प्रकरणी अटक.

Alisha Khedekar

  • मुंबई गुन्हे शाखेने मोहम्मद खतिब प्रकरणात PSI संजय जाधवला अटक

  • 1 कोटी रुपये मिळवून देण्याचे आश्वासन देत 10 लाख रुपये घेतल्याचा आरोप

  • तपासात जाधव हा राज खतिबच्या सतत संपर्कात असल्याचे उघड

  • जाधवविरोधात यापूर्वीही वाशी आणि सानपाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल

मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई गुन्हे शाखेकडून बनावट वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचे भासवून अनेकांची फसवणूक करणाऱ्या मोहम्मद खतिब उर्फ डॉ. राज खतिब प्रकरणात आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ येथील पोलीस उपनिरीक्षक (PSI) संजय रामभाऊ जाधवला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट-3 ने तपासादरम्यान त्याचे नाव समोर आल्यानंतर ही कारवाई केली.

गुजरातमधील रिअल इस्टेट व्यावसायिक नितीन चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२० मध्ये मोहम्मद खतिब, संजय जाधव आणि महसब घौस खतिबने चौधरी यांना त्यांचा मित्र अल्पेश पटेलला १ कोटी रुपये मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी १० लाख रुपयांचे कमिशन रोख स्वरूपात घेतल्याचा आरोप आहे. मात्र, आश्वासन दिलेले काम पूर्ण झाले नाही आणि घेतलेली रक्कमही परत करण्यात आली नाही.

तपासादरम्यान मिळालेल्या तांत्रिक पुराव्यांमधून जाधव हा राज खतिबच्या सतत संपर्कात असल्याचे समोर आले. तसेच मुंबई विमानतळाजवळील एका हॉटेलमध्ये तो खतिबसोबत उपस्थित होता. त्या वेळी त्याने स्वतःची ओळख गुन्हे शाखेतील अधिकारी म्हणून करून दिली. याशिवाय जाधवविरुद्ध यापूर्वी वाशी पोलीस ठाण्यात 2022 मध्ये आणि सानपाडा पोलीस ठाण्यात 2024 मध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची माहितीही तपासात उघड झाली आहे.

दरम्यान, मोहम्मद खतिबविरोधातील अडचणी वाढत असून त्याच्यावर आणखी अनेक गंभीर आरोप समोर येत आहेत. दक्षिण मुंबईतील एका महिलेने दाखल केलेल्या तक्रारीत खतिबने तिच्या कुटुंबाची फसवणूक केल्याचा, इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकल्याचा आणि लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. तसेच फार्मास्युटिकल वितरण व्यवसाय मिळवून देण्याच्या आमिषाने 5 लाख रुपयांची फसवणूक केल्याचाही दावा करण्यात आला आहे. या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे धमेंद्र कुमार नावाच्या व्यक्तीलाही अटक करण्यात आली असून तो तब्बल २८ वर्षे डॉक्टर म्हणून वावरत होता. गुन्हे शाखेने या संपूर्ण रॅकेटचा सखोल तपास सुरु केला असून आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाण्याचा एक थेंबही न घालता बनवा कुरकुरीत 'खेकडा भजी', चव एवढी भारी की न खाणारेही खातील

Maharashtra News Live Update: पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच

Crime: सून- सासऱ्याच्या अफेअरने संपूर्ण कुटुंबाचा शेवट, नवऱ्याने स्वत: विष पित बायकोला दिलं; नंतर वडील अन् भावाचा मृतदेह आढळला

NEET Paper Leak : पेपरफुटीप्रकरणी केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय, पीएम मोदींची घोषणा

Maharashtra Bandh: आज 'महाराष्ट्र बंद'; काय सुरू अन् काय बंद? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT