MUMBAI SHOCKER: 17-YEAR-OLD STUDENT MOLESTED INSIDE DAHANU KARWADI METRO STATION LIFT, POCSO CASE FILED Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai : मुंबई हादरली! कांदिवली मेट्रो स्थानकातील लिफ्टमध्ये तरुणीचा विनयभंग

Mumbai Kandivali Crime News : मुंबईतील कांदिवली मेट्रो स्थानकात १७ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी पॉक्सो आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

Alisha Khedekar

  • कांदिवली पश्चिमेतील डहाणूकरवाडी मेट्रो स्थानकात १७ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग

  • घटना मेट्रो स्थानकाच्या लिफ्टमध्ये घडली

  • आरोपी विरोधात बीएनएस आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

  • मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

संजय गडदे, मुंबई

Mumbai Kandivali Metro Girl Molested मुंबईतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. कांदिवली पश्चिमेतील डहाणूकरवाडी मेट्रो स्थानकात 17 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे मेट्रो स्थानकांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. संबंधित विद्यार्थिनी नेल आर्टच्या क्लाससाठी (Nail Art Class Mumbai) जात होती. डहाणूकरवाडी मेट्रो (Dahanukarwadi Metro ) स्थानकात आल्यांनतर तिने प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर जाण्यासाठी लिफ्टचा वापर करत केला. त्यावेळी लिफ्टमध्ये ती एकटीच असल्याचा फायदा घेत लिफ्टमध्ये उपस्थित असलेल्या एका अज्ञात व्यक्तीने तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.

घटनेनंतर विद्यार्थिनी घाबरलेल्या अवस्थेत बाहेर आली आणि तिने आपल्या कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांसह तिने कांदिवली पोलिस ठाण्यात (Kandivali Police Station) धाव घेत तक्रार दाखल केली. विद्यार्थिनीच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत एफआयआर दाखल केला आहे. आरोपीची ओळख पटवण्यासाठी मेट्रो स्थानक परिसरातील तसेच लिफ्टजवळील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे.

आरोपीचा लवकरात लवकर शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके सक्रिय करण्यात आली आहेत. संशयिताच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी विविध तांत्रिक साधनांचाही वापर केला जात असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या घटनेमुळे मेट्रो स्थानकांमधील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.दरम्यान पोलीस या घटनेप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Halwai Style Jalebi: सण किंवा खास प्रसंगी घरच्या घरी बनवा हलवाईसारखी केशर जिलेबी; नोट करा ही सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: चाकणच्या घटनेनंतर शिरूरमध्येही महिलेवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला

रंग गोरा करण्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानी क्रीममागे दहशतवाद्यांचा काळा चेहरा? नांदेडमधील FDA कारवाईनंतर ATS ची एन्ट्री होणार?

Blue Jeans Ban: 'या' देशात निळी जीन्स घातल्यास होतो तुरुंगवास?

आधी वहिनीचं डोकं दगडानं ठेचलं; नंतर भावाचा जेथे मृतदेह सापडला होता तेथेच घेतला गळफास, दुहेरी हत्याकांडाचं गूढ काय?

SCROLL FOR NEXT