Mumbai Vaccination  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Corona Vaccine: मुंबईत खरंच कोरोनाची भीती संपली? नाकावाटे लस घेण्यास मुंबईकरांची पाठ; 12 दिवसांत फक्त 81 जणांनी घेतली लस

Latest News: लसीकरण सुरु होऊन 12 दिवस झाले. तेव्हापासून ते आतापर्यंत फक्त 81 नागरिकांनी लस घेतल्याचे समोर आले आहे.

Priya More

Mumbai News: कोरोना रुग्णांचा (Corona Patient) वाढता आकडा रोखण्यासाठी मुंबई महानगर पालिकेकडून (BMC) नाकावाटे कोरोना लस देण्याची मोहीम सुरु करण्यात आली. पण या लसीकरण मोहिमेला (Vaccination) नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. नाकावाटे कोरोना लस घेण्यास मुंबईकरांनी पाठ फिरवली आहे. कारण हे लसीकरण सुरु होऊन 12 दिवस झाले. तेव्हापासून ते आतापर्यंत फक्त 81 नागरिकांनी लस घेतल्याचे समोर आले आहे.

कोरोनाबाधितांचा आकडा कमी होत असला तरी 29 एप्रिल रोजी मुंबई महानगरपालिकेने नाकाद्वारे देण्यात येणाऱ्या इन्कोव्हॅक लसीकरणाचा शुभारंभ केला होता. 60 वर्षांवरील पात्र नागरिकांना कोविशिल्ड अथवा कोवॅक्सीनची दुसरी मात्रा घेतल्यानंतर सहा महिन्यांनी इन्कोव्हॅक (iNCOVACC) लसीची प्रतिबंधात्मक मात्रा देण्यात येत आहे. या लसीकरणाचा शुभारंभ होऊन 12 दिवस झाले तरी 100 लाभार्थ्यांचा आकडा पार होऊ शकलेला नाही.

या लसीकरण मोहीमेला सुरुवात झाल्यापासून केवळ 81 नागरिकांनी ही लस घेतल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेच्या 24 प्रभागात एक लसीकरण केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. एकंदरीतच नाकाद्वारे लस घेण्यात नागरिकांनी नापसंती व्यक्त केली आहे. या लसीकरणाला नागरिकांनी पाठ फिरवल्यामुळे नेमकी मुंबईकरांना कोरोनाची भीती वाटते की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, मुंबईत कोरोनाचा वेग मंदावला आहे. मंगळवारी मुंबईत कोरोनाचे 56 नवीन रुग्ण आढळले आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) एका आरोग्य बुलेटिनमध्ये सांगितले की, 'मुंबईत मंगळवारी 56 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. अशापद्धतीने मुंबईतील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 1,163,352 वर पोहोचला आहे. मंगळवारी कोणत्याही कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाला नाही.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

SCROLL FOR NEXT