Cold Wave In Mumbai Saam Digital
मुंबई/पुणे

Cold Wave In Mumbai : मुंबईकरांना पुन्हा येणार गुलाबी थंडीचा अनुभव, किमान तापमान १५ अंशांनी खाली जाणार

Cold Wave In Mumbai : पुढील आठवड्याभरात मुंबईतील किमान तापमान घसरण्याची शक्यता आहे. किमान तापमान १५ अंशांच्या खाली जाण्याची शक्यता ‘मुंबई रेन’ने वर्तवली आहे. त्यामुळे मुंबईकरांना पुन्हा एकदा बोचऱ्या थंडीचा अनुभव घेता येणार आहे.

Sandeep Gawade

Cold Wave In Mumbai

पुढील आठवड्याभरात मुंबईतील किमान तापमान घसरण्याची शक्यता आहे. किमान तापमान १५ अंशांच्या खाली जाण्याची शक्यता ‘मुंबई रेन’ने वर्तवली आहे. त्यामुळे मुंबईकरांना पुन्हा एकदा बोचऱ्या थंडीचा अनुभव घेता येणार आहे. १९ ते २० फेब्रुवारीला उत्तरेकडून थंड वारे वाहण्यासाठी थोडा वेळ लागेल. त्यानंतर मात्र २० फेब्रुवारीपासून थंड हवामान सुरू होईल. त्यानंतर हवामानात बदल जाणवू लागेल. समुद्राच्या वाऱ्याची सक्रियता कायम असेल, त्यामुळे तापमान जास्त वाढणार नाही. अर्थात मुंबईत पुन्हा आल्हाददायक, आरामदायी हवामान तयार होणार असून लोकांना या हवामानाचा आनंद घेता येणार आहे.

‘मुंबई रेन’ने दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यात मुंबईतील किमान तापमान १५ अंश सेल्सिअसपर्यंत घसरणार आहे. यामुळे सोमवार ते शनिवार (ता. १९ ते ता. २४) मुंबईकरांना गारवा अनुभवता येणार आहे. पुणे येथील किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली जाण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. उत्तरेकडील वाऱ्यांच्या सक्रियतेमुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे आणि समुद्राच्या झुळुकांच्या उपस्थितीमुळे कमाल तापमानात ही घट होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तापमान ३४ अंश ते ३५ अंशांवरून ३० अंशांपर्यंत खाली येईल अशी शक्यता आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

किल्ले शिवनेरीवर आलेल्या ७० पर्यटकांवर मधमाश्यांचा हल्ला

शिवजयंतीच्या (Shivjayanti Utsav 2024) पुर्वसंध्येला शिवनेरी किल्ल्यावर शिवभक्त, तसेच पर्यटक गर्दी करत आहेत. अशातच किल्ले शिवनेरीवर आलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. शिवनेरीजवळील तुळजालेणी पहाण्यासाठी हे पर्यटक आले होते. यावेळी पुणे मुंबई परिसरातील चिमुकल्यांसह महिला, जेष्ठ नागरिकांसह ७० पर्यटकांवर मधमाश्यांनी हल्ला चढवला.

या हल्ल्यामध्ये चिमुकल्यासह ४ जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या जखमींवर सध्या जुन्नर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पर्यटकांना पाहून काही हुल्लडबाज तरुणांनी मधमाश्यांच्या मोहोळावर दगड फेक केली. ज्यानंतर मधमाश्यांनी हल्ला चढवल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : दुपारी उन्हाचा चटका, पहाटे गारठा, वाचा राज्यातील हवामानाचा अंदाज

IRCTC App: रेल्वे प्रवाशांचं काम झटक्यात अन् सोपं होणार, तिकीट बुकिंगपासून सगळ्या सुविधा एकाच अ‍ॅपवर

मोठी कारवाई! अमरावतीमध्ये तब्बल ६ कोटींचे सोनं-चांदी जप्त, नागपूरवरुन निघालेल्या गाडीत सापडले घबाड!

Maharashtra Election : ऐन निवडणुकीत बेधडक कारवाई, एकनाथ शिंदेंनी बंडखोर महेश गायकवाड यांच्यासह १० जणांची केली हकालपट्टी!

Todays Horoscope: काही राशींची आर्थिक अडचण होईल दूर, तर काहींच्या नात्यात होईल वाद, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT