Commuters at CSMT station. Central Railway has scheduled a Mega Block this Sunday, April 12, for essential infrastructure maintenance and safety works." saam tv
मुंबई/पुणे

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी मध्य आणि हार्बर लाईनवर 'मेगा ब्लॉक'; कोणत्या गाड्या बंद राहणार?

Central Railway Sunday Mega Block 12 April 2026 Timings: मध्य रेल्वे, मुंबई विभागात रविवार १२ एप्रिल २०२६ रोजी मेन आणि हार्बर लाईनवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Omkar Sonawane

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात पायाभूत सुविधांची देखभाल आणि दुरुस्ती करण्यासाठी येत्या रविवारी, १२ एप्रिल २०२६ रोजी उपनगरीय मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल वाहतुकीवर परिणाम होणार असून अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वे (Main Line): धिम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल.

CSMT येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धिम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबून पुन्हा धिम्या मार्गावर धावतील. घाटकोपर येथून सकाळी १०.१९ ते दुपारी ३.५२ पर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील गाड्या विद्याविहार ते CSMT दरम्यान जलद मार्गावर धावतील.

२. हार्बर लाईन (Harbor Line): सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे सेवा खंडित

हार्बर मार्गावर सकाळी **११.१० ते सायंकाळी ४.४०** वाजेपर्यंत मोठा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

रद्द गाड्या: CSMT येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ दरम्यान वाशी, बेलापूर, पनवेलकडे जाणारी वाहतूक बंद राहील. तसेच, वांद्रे आणि गोरेगावकडे जाणारी सेवाही सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ पर्यंत रद्द असेल.

परतीचा प्रवास: पनवेल, बेलापूर, वाशी आणि गोरेगाव येथून CSMT कडे येणारी वाहतूकही दुपारी ३.२० ते सायंकाळी ५.१३ पर्यंत बंद राहणार आहे.

प्रवाशांसाठी विशेष सोय:

ब्लॉक काळात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष लोकल गाड्या चालवण्यात येतील.

हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

रेल्वे प्रशासनाचे आवाहन

रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या मजबुतीकरणासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हे काम करणे अत्यावश्यक आहे. प्रवाशांनी सहकार्य करावे आणि आपल्या प्रवासाचे नियोजन लोकलच्या बदललेल्या वेळापत्रकानुसार करावे, असे आवाहन मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुणे हादरले! दुसऱ्याशी लग्न ठरल्याचा राग, तरुणाने घरात घुसून गर्लफ्रेंडवर चाकूने केले सपासप वार

LPG Rule: मोठी बातमी! १ मेपासून एलपीजी सिलिंडरच्या नियमात मोठे बदल, सर्वसामान्यांना दिलासा मिळणार

पावसाच्या प्रत्येक थेंबाची अचूक नोंद होणार, पुण्यातील दाम्पत्यानं बनवलं 'पर्जन्यमापक यंत्र'

मानखुर्दमध्ये क्रेन कोसळली, मुंबईची वाहतूक 22 तास ठप्प

कामगारांच्या नोकरीवर टांगती तलवार? कामगारांवर आता कायद्यानं कुऱ्हाड

SCROLL FOR NEXT