Central Railway Mega Block Saam Digital
मुंबई/पुणे

Central Railway : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; लोकल ट्रेन उशिराने, प्रवाशांचे प्रचंड हाल

Central Railway latest news : मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. भांडूप ते विक्रोळी रेल्वेदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली. याचा मठा फटका प्रवाशांना बसला आहे.

Vishal Gangurde

गिरीश कांबळे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक गुरुवारी सकाळी विस्कळीत झाली. यामुळे सकाळच्या सुमारास ऑफिस गाठण्यासाठी घराबाहेर पडलेल्या प्रवाशांना फटका बसला. या आठवड्यात दोन-तीन वेळा मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. त्यानंतर त्यात आजच्या दिवसाचीही भर पडली. ऐन कामाला जाण्याच्या वेळेला वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

मध्य रेल्वेची सकाळची सुरुवात पुन्हा एकदा वाहतूक विस्कळीत होत झाली आहे. मध्य रेल्वेवरील भांडूप आणि विक्रोळी रेल्वे स्टेशनदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळत आहे. भांडूप ते विक्रोळीदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल ट्रेन खोळंबल्या. त्याचा फटका मुंबईकर प्रवाशांना बसला. रेल्वे वाहतूक विस्कळीत होऊन लोकल ट्रेन उशिराने धावत आहेत. लोकल ट्रेन उशिराने धावू लागल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

लोकल ट्रेन उशिराने

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यानंतर लोकल 20-25 मिनिटं उशिराने धावत आहेत. विक्रोळी येथे फास्ट ट्रॅकवर झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेच्या विक्रोळी ते भांडूपदरम्यान तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने सकाळी 8 वाजता हा बिघाड दुरुस्त केला. मात्र तरीही लोकल नियोजित वेळेच्या उशिराने धावत आहेत.

मुंबईत पावसाची शक्यता

राज्यासहित मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागने आज मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT