Mumbai Local Sunday Mega Block  x
मुंबई/पुणे

Mumbai Mega Block : मध्य-हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक! एक्सप्रेस गाड्यांचे डायव्हर्जन, लोकलचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा

Mumbai Local Sunday Mega Block : मध्य-हार्बर रेल्वे मार्गांवर रविवारी ८ जून रोजी मेगाब्लॉक असणार आहे. रेल्वेची विविध कामे करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

Yash Shirke

Mega Block News : रेल्वेची विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी म्हणजे ८ जून २०२५ रोजी मेगा ब्लॉक परिचालीत करण्याचा निर्णय घेतला आहे. या मेगा ब्लॉकमुळे लोकल गाड्यांसह मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. चला जाणून घेऊयात रविवारच्या मेगा ब्लॉकच्या वेळापत्रकाबाबत...

मुख्य मार्गावर विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान सकाळी ८.०० ते दुपारी १.३० पर्यंत ५ व्या आणि ६ व्या मार्गावर मेगाब्लॉक असेल.

अप मेल/एक्सप्रेस गाड्यांचे डायव्हर्जन

पुढील अप मेल/एक्सप्रेस गाड्या ठाणे येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील.

लोकमान्य टिळक टर्मिनस येथे जाणाऱ्या गाड्या विद्याविहार स्थानकावर सहाव्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील.

- गाडी क्रमांक 11010 पुणे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिंहगड एक्सप्रेस

- गाडी क्रमांक 12124 पुणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन

- गाडी क्रमांक 13201 पटना- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस

- गाडी क्रमांक 17221 काकीनाडा- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस

- गाडी क्रमांक 12126 पुणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रगती एक्सप्रेस

- गाडी क्रमांक 12140 नागपूर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस

- गाडी क्रमांक 22226 सोलापूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस

- गाडी क्रमांक 12168 बनारस- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस

- गाडी क्रमांक 12321 हावडा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस

- गाडी क्रमांक 12812 हटिया -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस

- गाडी क्रमांक 11012 सोलापूर -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस

डाउन मेल/एक्सप्रेस गाड्यांचे डायव्हर्जन

पुढील डाउन मेल/एक्सप्रेस गाड्या विद्याविहार स्टेशनवर डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील आणि पाचव्या मार्गावर ठाणे येथे पुन्हा वळवल्या जातील.

- गाडी क्रमांक 11055 लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपुर एक्सप्रेस

- गाडी क्रमांक 11061 लोकमान्य टिळक टर्मिनस- जयनगर एक्सप्रेस

- गाडी क्रमांक 16345 लोकमान्य टिळक टर्मिनस -तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस

- गाडी क्रमांक 17222 लोकमान्य टिळक टर्मिनस- काकीनाडा एक्सप्रेस

पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान (पोर्ट लाईन वगळून) अप आणि डाउन हार्बर लाईनवर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत मेगा ब्लॉक राहणार आहे.

हार्बर लाईन ब्लॉक विभाग

पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणाऱ्या अप हार्बर लाईनवरील सेवा सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ पर्यंत आणि

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पनवेल/बेलापूर येथे जाणाऱ्या डाउन हार्बर लाईनवरील सेवा सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ पर्यंत रद्द राहतील.

ट्रान्स हार्बर लाईन ब्लॉक विभाग

पनवेल येथून ठाणे येथे जाणारी अप ट्रान्स- हार्बर लाईन सेवा ११.०२ ते १५.५३ पर्यंत आणि ठाणे येथून पनवेल येथे जाणारी डाउन ट्रान्स-हार्बर लाईन सेवा १०.०१ ते १५.२० पर्यंत रद्द राहतील.

ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी विभागात विशेष लोकल चालतील.

ब्लॉक काळात ठाणे- वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्स- हार्बर लाईन सेवा उपलब्ध असतील.

ब्लॉक काळात बेलापूर/नेरूळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट लाईन सेवा उपलब्ध असतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack Tests: हार्ट अटॅकची भीती वाटतेय? मग आत्ताच करा या 2 टेस्ट, डॉक्टरांनी सांगितली महत्वाची माहिती

Dam Water Level: पुणेकरांची चिंता वाढली! पवना धरणात २४ टक्के पाणी, इतर धरणांची स्थिती काय? ताजी आकडेवारी आली समोर

Maharashtra News Live Update: दिल्लीत हॉटेलमध्ये भीषण आग, आतापर्यंत 21 जणांचा होरपळून मृत्यू

लग्न करण्याचं वय काय? मुला आणि मुलींचे वय वेगवेगळे असते का?

Stomach cancer symptoms: शरीरात हे 4 बदल दिसले तर समजा पोटाचा कॅन्सर झालाय, लक्षणं ओळखणं फारच कठीण

SCROLL FOR NEXT