FIRE AT BYCULLA POLICE STATION MUMBAI saam tv
मुंबई/पुणे

मुंबई हादरली! भायखळा पोलीस स्टेशनला भीषण आग|VIDEO

Fire At Byculla Police Station Mumbai Cause And Updates: मुंबईतील भायखळा पोलीस ठाण्याच्या इमारतीत अचानक आग लागल्याची घटना. अग्निशमन दलाने वेळीच नियंत्रण मिळवले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज, कोणतीही जीवितहानी नाही.

Omkar Sonawane

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबईच्या भायखळा पोलीस ठाण्याच्या इमारतीला रविवारी अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 ते 6 गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून अथक प्रयत्नानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नसून सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पूर्णपणे सुखरूप आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भायखळा पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर ही आग लाग होती. पाहिल्या मजल्यावरून धूर निघत असल्याचे लक्षात येताच इमारतीला सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. अग्निशमन दलाच्या 5-6 गाड्यांनी घटनास्थळी पोहोचून वेळेत बचावकार्य सुरू केल्यामुळे आग पासरण्यापूर्वीच आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज

या घटनेबाबत माहिती देताना मुंबई पोलिस दलाने सांगितले की, भायखळा पोलिस ठाण्याच्या इमारतीतील आग पूर्णपणे विझवण्यात आली आहे. प्राथमिक पाहणीनुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत असून, या प्रकरणी पुढील आवश्यक प्रशासकीय आणि तांत्रिक कारवाई केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारताच्या 'गोल्डन क्वीन'ची हॅटट्रिक! मीराबाई चानूनं मिळवलं सलग तिसरं सुवर्ण पदक; कॉमनवेल्थ बनवला नवा विक्रम

BE पदवी, खासगी अनुभव... तरीही महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्याची नोकरी; कारण काय?

अकोट-अंजनगाव मार्गावर शिक्षकांची बस उलटली; अधिवेशन आटोपून परतताना घडला अनर्थ

Maharashtra News Live Update: आमदार जितेंद्र आव्हाड आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच मंचावर..

सोलापूर हादरले! रेल्वेखाली झोकून देत आई-मुलीने संपवलं जीवन

SCROLL FOR NEXT