Mumbai Breaking News  saam tv
मुंबई/पुणे

Breaking News : मुंबईत सात मजली इमारत कोसळली; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

मुंबईतील बोरिवलीच्या पश्चिम भागात धोकादायक इमारत कोसळली आहे.

साम टिव्ही ब्युरो

संजय गडदे

Mumbai News : मुंबईच्या (Mumbai) बोरिवलीमधून धक्कादायक वृत्त समोर आले आहे. मुंबईतील बोरिवलीच्या पश्चिम भागात धोकादायक इमारत (Building) कोसळली आहे. या घटनेत सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाचे जवान हे घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील बोरिवली पश्चिमेकडील वजीरा नाका, प्रणय नगर येथील धोकादायक स्थितीतील सात मजली इमारत होती. या धोकादायक इमारतीचे पाडकाम सुरू असतानाच इमारतीचा एक भाग बाजूला असलेल्या रस्त्यावर कोसळला. त्या ठिकाणी चार ते पाच चारचाकी गाड्या उभ्या होत्या.

रस्त्यावर उभ्या वाहनांवर मलबा कोसळल्यामुळे गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे प्राथमिक माहिती समोर आलेली आहे.

वजीरा नाका परिसरात एका खाजगी इमारतीचे कंत्राटदारामार्फत पाडकाम सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी इमारतीच्या कंत्राटदाराचा निष्काळजीपणा दिसून येत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. परंतु कंत्राटदाराने निष्काळजीपणा केला आहे का, याचा तपास सध्या अग्निशमन दल आणि बोरिवली पोलीस करत आहेत. या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MHT-CET Exam 2027 : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! MHT CET ची परीक्षा कधी होणार? सीईटी सेलची महत्त्वाची माहिती

Maharashtra News Live Update: २२ किलोमीटरच्या रस्त्यासाठी गडचिरोलीत हजारो आदिवासींचा एल्गार

Carpet Cleaning : घाणेरडे कार्पेट स्वच्छ करण्यासाठी एकही रुपया खर्च नको! घरच्या घरी ड्राय क्लीनिंग करण्याच्या 3 सोप्या स्टेप्स

AC temperature: कोणत्या तापमानावर एसी चालवल्याने विजेचे बिल कमी होतं?

Akshay Kumar : टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा अक्षय कुमारने घेतला धसका? घराबाहेर वाढवली सुरक्षा

SCROLL FOR NEXT