Dahisar Link Road Bridge Accident Saamtv
मुंबई/पुणे

Mumbai Accident: दहिसर लिंक रोड पुलावर भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू; १ गंभीर जखमी

Dahisar Link Road Bridge Accident: दहिसर पूर्वेकडील आनंद नगर लिंक रोड पुलावर लक्झरी बस आणि कारचा भयंकर अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.

Gangappa Pujari

संजय गडदे, मुंबई|ता. २१ डिसेंबर २०२३

Mumbai Accident News:

मुंबईमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. मुंबईच्या दहिसर पूर्वेकडील आनंद नगर लिंक रोड पुलावर लक्झरी बस आणि कारचा भयंकर अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये एक महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे. (Mumbai Breaking News)

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या दहिसर (Mumbai Dahisar) परिसरातील आनंद लिंक रोड पुलावर गुरूवारी (२१ डिसेंबर) भीषण अपघाताची (Accident) घटना घडली. लक्झरी बस आणि भरधाव कारमध्ये हा भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झालेत.

रोहन बंगेरा असे या जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याला दहिसर येथील नवनीत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांचा सध्या शोध सुरू आहे. दहिसर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शाळकरी मुलांच्या बसचा अपघात..

सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन शैक्षणिक सहलीला निघालेल्या बसचा भीषण अपघात झाला. वेगात असलेल्या एसटी बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशर ट्रकला जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. या अपघातात एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. तर एक शिक्षक गंभीर जखमी झाला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Metro : मुंबई मेट्रो ४ चे ऑडिट करण्याचे आदेश! आर-सिटी मॉलजवळील 'त्या' भेगांमुळे प्रशासन हादरले

Accident : ४ दिवसापूर्वी साखरपुडा आज काळाने घात केला; धाराशिवमध्ये अक्षय-अक्षयाचा मृत्यू

Vijay and Rashmika: लग्नाची तयारी जोरदार सुरु...; विजय देवरकोंडा अन् रश्मिका मंदान्ना उदयपुरला निघाले , पाहा VIDEO

Bigg Boss Marathi 6 : टोळी फुटली; रुचिताचा खरा चेहरा रोशनसमोर आला, पाहा धक्कादायक VIDEO

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये महिलांचा तुफान राडा

SCROLL FOR NEXT