Maharashtra Politics Latest News: Saamtv
मुंबई/पुणे

Breaking News: विधानसभेआधी काँग्रेसला जोर का झटका? मुंबईतील तरुण आमदार अजित पवार गटात जाण्याची शक्यता; बॅनर्स झळकल्याने रंगल्या चर्चा

Maharashtra Politics Latest News: आज राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा मुंबईमध्ये येत असतानाच झिशान सिद्दिकी यांनी या यात्रेच्या स्वागताचे बॅनर्स झळकावले आहेत, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

Gangappa Pujari

मुंबई, ता. १९ ऑगस्ट २०२४

राज्यात विधानसभा निवडणुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली असून सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. अशातच निवडणुकांआधी काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे तरुण नेते मुंबईतील वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार झिशान सिद्दिकी हे अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. आज राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा मुंबईमध्ये येत असतानाच झिशान सिद्दिकी यांनी या यात्रेच्या स्वागताचे बॅनर्स झळकावले आहेत, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

मुंबईमध्ये काँग्रेसला धक्का?

याबाबत सविस्तर माहिती अशी की, विधानसभेच्या मोर्चेबांधणीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाने राज्यभर जनसन्मान यात्रेचे आयोजन केले आहे. आज ही जनसन्मान यात्रा मुंबईमध्ये दाखल होत आहे. या यात्रेचे काँग्रेसचे तरुण आमदार झिशान सिद्दीकी यांनी बॅनर्स लावून स्वागत केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

तरुण आमदार सोडणार साथ?

राष्ट्रवादी अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा मुंबईमध्ये काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी तसेच नवाब मलिक यांच्या मतदार संघातून जाणार आहे. याच भागात काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी अजित पवार तसेच प्रफुल्ल पटेल यांच्या स्वागताचे बॅनर झळकावले आहेत. आजच्या मुंबईमधील सभेलाही ते हजेरी लावणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे झिशान सिद्दीकी हे काँग्रेसची साथ सोडणार असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासन झिशान सिद्दीकी हे पक्षामध्ये नाराज आहेत. काँग्रेसकडून बैठकांना बोलावले जात नसल्याची, वारंवार डावलले जात असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली होती. तसेच नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकांमध्ये क्रॉस वोटिंग केल्याचा आरोपही झिशान सिद्दीकी यांच्यावर लावण्यात आला आहे. त्यामुळे ते अजित पवार गटात जाण्याची शक्यता असून असे झाल्यास काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव कारची टेम्पो अन् दुचाकीला धडक, एकाचा जागीच मृत्यू; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर

Relationship Tips: सासूबाईंची आवडती सून होण्यासाठी करा 'या' ५ गोष्टी; सासरवाडीत व्हाल सर्वांच्या लाडक्या

Tuesday Horoscope: संपत्तीत वाढ होणार! ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

काँग्रेस नेत्यावर गोळीबार; 6-7 गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोलारांनी काढला पळ

Maharashtra News Live Update: शिवसेनेकडून आमदार बच्चू कडू यांच्याकडे मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT