Borivali Crime Saam News
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: छताद्वारे घुसला घरात, रात्री मारला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला, 'असा' अडकला पोलिसांच्या जाळ्यात

Borivali Crime News: घराच्या छताद्वारे घरात घुसून सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या चोरट्याला बोरिवली पोलीसांनी शिताफीने अटक केलंय.

Bhagyashree Kamble

घराच्या छताद्वारे घरात घुसून सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या चोरट्याला बोरिवली पोलीसांनी शिताफीने अटक केलंय. सात लाख रूपयांचे दागिने चोरून चोर फरार झाला होता, मात्र पोलिसांना सीसीटिव्हीच्या आधारे चोरट्यापर्यंत पोहचण्यास मदत झाली. आरोपीकडून एकूण ७ लाख रूपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून, चोरट्याला अटक करण्यात आलं आहे.

हरिओम उर्फ भडकू शिवकुमार विश्वकर्मा (३०) असे अटक केलेल्या आरोपीचं नाव असून, त्याच्याकडून एकूण ७ लाख रूपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आलं आहे. तसेच चोरट्यालाही ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं आहे.

बोरीवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोराई येथे एक मजलीमध्ये कुटुंब राहत आहे. याच घराच्या छताद्वारे घुसून कपाटात ठेवलेले ७ लाख किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यानं लंपास केलं. या प्रकरणी बोरिवली पोलिसांना माहिती देण्यात आली. प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेत पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी सगळे सीसीटिव्ही तपासले.

सीसीटीव्ही तपासल्यानंतर आरोपी चोरी करून निघून जात असल्याचं दिसले. बोरिवली पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि सूत्रांच्या मदतीने नेरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रायगड जिल्ह्यातून आरोपीला अटक केलं. आरोपींकडून १४० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केलं असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी अधिक माहिती दिली. 'गोराई येथे रात्री वन प्लस वनच्या छताद्वारे बेडरूममध्ये चोरट्यानं प्रवेश केला. चोरट्यानं सात लाख रूपयांचे सोन्याचे दागिने चोरले आणि तेथून फरार झाला. नंतर दागिने चोरीला गेल्याची तक्रार नोंदवण्यात आली. तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल केल्यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीनं आरोपी शिवकुमारला अटक करण्यात आलं. तसेच त्याच्याकडून रायगड जिल्ह्यातील शेलू या गावातून चोरट्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्या घरातून सोन्याचे दागिने जप्त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रात्री भात खाल्ल्याने खरंच वजन वाढतं का?

Maharashtra News Live Update: सिंधुदुर्गात पावसाची संततधार सुरू

Rain Alert: पुढचे १० तास महत्वाचे! वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, ताशी ७० ते ८० वेगाने वारे वाहणार; महाराष्ट्रासह १६ राज्यांना इशारा

आधी ज्योतिष्याला OSDपद, आता चित्रपट निर्मात्याची थेट कॅबिनेट मंत्रिपदी नियुक्ती; मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानं खळबळ

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई ते दिल्लीसह 9 मार्गांवर वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस; सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT