BMC Legal Department Transfers 20 Assistant Law Officers  AI Image
मुंबई/पुणे

BMC Officer Transfer : मुंबई महापालिकेच्या विधी विभागात मोठा फेरबदल! २० अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

BMC Officer Transfer News : मुंबई महापालिकेच्या विधी विभागातील सहाय्यक कायदा अधिकारी आणि सहाय्यक कायदा अधिकारी-२ पदावरील २० अधिकाऱ्यांच्या बदल्या.

Alisha Khedekar

  • मुंबई महापालिकेच्या विधी विभागातील २० सहाय्यक कायदा अधिकाऱ्यांच्या बदल्या

  • ३० जुलै पासून त्यांची अंमलबजावणी झाली आहे

  • घाऊक बदल्यांमुळे विधी विभागातील अधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा

मुंबई महानगरपालिकेच्या विधी विभागातील सहाय्यक कायदा अधिकारी आणि सहाय्यक कायदा अधिकारी-२ या पदांवरील तब्बल २० अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांची अंमलबजावणी ३० जुलै २०२६ पासून करण्यात आली आहे. मात्र, अचानक मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या या फेरबदलामुळे विधी विभागातील अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा आहे. आगामी विधी समितीच्या बैठकीत या बदल्यांचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महापालिकेच्या कायदा विभागाने बदल्यांसंदर्भात परिपत्रक जारी केले असून, विविध न्यायालयांमध्ये सुरू असलेल्या प्रकरणांची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, शहर दिवाणी न्यायालयातील प्रकरणांची जबाबदारी सांभाळणाऱ्या काही वकिलांना आता मुंबई उच्च न्यायालयाशी संबंधित कामकाजाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे नव्या जबाबदाऱ्या स्वीकारताना अधिकाऱ्यांवर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिकेशी संबंधित विविध विभागांची अनेक प्रकरणे शहर दिवाणी न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. या खटल्यांची संख्या मोठी असून, विविध अंदाजानुसार सुमारे लाखभर प्रकरणे न्यायालयांमध्ये सुरू आहेत. त्यामुळे या सर्व प्रकरणांचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी विधी विभागातील सहाय्यक कायदा अधिकाऱ्यांवर असते. आधीच मोठ्या प्रमाणात कामाचा ताण असताना वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे अधिकाऱ्यांना नव्या विषयांसाठी अतिरिक्त वेळ द्यावा लागतो.

दरम्यान, गेल्या वर्षी विधी विभागातील वकील कुणाल वाघमारे यांचे महापालिका मुख्यालयातच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांनी सहाय्यक कायदा अधिकारी संगीता होनमाने यांनाही अस्वस्थ वाटल्याची घटना घडली होती. या घटनांमुळे विधी विभागातील कामाचा वाढता ताण याबाबतही चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे या घाऊक बदल्यांबाबत विधी समितीच्या बैठकीत प्रशासनाला प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan's Gym Fire: सलमान खानच्या जिमला भीषण आग; नेमकं काय घडलं?

Rahul Gandhi Today Live : महिलांवर अत्याचार करणे हे बीजेपीचा पॅटर्न- खासदार प्रणिती शिंदे

Maharashtra News Live Update: योग्य दिशेने जाणारा युवा समाजाला जगवतो - देवेंद्र फडणवीस

Cold-Cough Medicine: लहान मुलांना सर्दी-खोकल्याची 'ही' औषधं देण्यावर बंदी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

तुम्ही खात असलेल्या मसाल्यांमध्ये भेसळ आहे का? या ५ पद्धतीने आजच तपासा नाहीतर आरोग्य येईल धोक्यात

SCROLL FOR NEXT