BMC elections  saam tv
मुंबई/पुणे

BMC Election Result: मुंबईत भाजप- ठाकरेंमध्ये काँटे की टक्कर, सुरूवातीच्या कलांमध्ये कुणाला किती जागा?

mumbai bmc election results: मुंबई महानगर पालिका निवडणुकीचा निकालाचे चित्र काही तासांत स्पष्ट होईल. सुरूवातीचे काल हाती आले असून यामध्ये भाजप आणि ठाकरेंमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. सुरूवातीच्या कलात कोण किती जागांवर आघाडीवर आहे वाचा....

Priya More

Summary -

  • मुंबई महानगर पालिकेच्या २२७ जागांसाठी मतमोजणी सुरू

  • सत्ता स्थापनेसाठी ११४ जागांचा जादुई आकडा

  • सुरूवातीच्या कलांमध्ये महायुती आघाडीवर

  • भाजप आणि ठाकरे यांच्यात चुरशीची लढत

मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या निकाल आज जाहीर होत आहे. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबई महानगर पालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. मुंबई महानगर पालिकेच्या २२७ जागांसाठी ५२.९४ टक्के मतदान झालं.

मुंबईमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी ११४ जागांची आवश्यकता आहे. ही मॅजिक फिगर कोण गाठतंय हे पाहणं महत्वाचे ठरेल. थोड्याच वेळात मुंबईतील निकालाचे चित्र स्पष्ट होईल. मुंबईचा महापौर महायुतीचा होणार की ठाकरे बंधूंच्या युतीचा होणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल...

सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली असून आता सुरूवातीचे कल हाती आले आहे. या कलानुसार मुंबईतील २२७ वॉर्डपैकी महायुती ६९ जागांवर आघाडीवर आहे. तर ठाकरे बंधू ४२ जागांवर आघाडीवर आहे. तर स्वबळाचा नारा देत स्वतंत्र निवडणूक लढवलेला काँग्रेस पक्ष ११ जागांवर आघाडीवर आहेत. तर इतर ६ जागांवर आघाडीवर आहेत.

सुरूवातीच्या कलानुसार, मुंबई महानगर पालिकेमधील २२७ वॉर्डपैकी ५१ वॉर्डमधील भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. शिवसेना शिंदे गटाचे १८ उमेदवार आघाडीवर आहेत. ठाकरे बंधूंनी युती करत मुंबई महानगर पालिकेची निवडणूक लढवली होती. शिवसेना ठाकरे गट ३५ जागांवर आघाडीवर आहे. मनसे ७ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस ११ जागांवर आघाडीवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस १ जागांवर आघाडीवर आहे. तर इतर ६ जागांवर आघाडीवर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये धावत्या टिप्परला लागली आग

Madhavi Nimkar: चाळीशीतल्या माधवी निमकरचं आरस्पानी सौंदर्य, फोटो पाहून काळीज धडधडलं...

Pudina Chutney Recipe: उन्हाळ्यात तोंडाची चव वाढवणारी पुदीना चटणी कशी बनवायची?

Blood Pressure : झोपण्यापूर्वी ३ तास आधी जेवण कराच, BP अन् आणि शुगर राहील कंट्रोलमध्ये; नव्या संशोधनातून महत्त्वाची माहिती

America: 'भारतीय चांगले अ‍ॅक्टर', रशियन तेल खरेदीवरून अमेरिकेच्या ट्रेझरी सेक्रेटरींचं विधान

SCROLL FOR NEXT