Mumbai police register a case against BJP office bearer following allegations of obscene behavior during a WhatsApp video call. saam tv
मुंबई/पुणे

एका तासासाठी घरी येऊ का? मध्यरात्री भाजप नेत्याचा नग्न अवस्थेत व्हिडिओ कॉल, महिलेच्या आरोपाने राजकारणात खळबळ

Mumbai BJP Leader Obscene Video Call Allegation: मुंबईतील भाजप पदाधिकाऱ्यावर पक्षाच्या महिला कार्यकर्त्याने व्हिडिओ कॉलद्वारे अश्लील कृत्य केल्याचा आरोप केला असून त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Omkar Sonawane

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबईतील भाजपच्या एका पदाधिकाऱ्यावर महिला कार्यकर्तीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी डोंगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी युसूफ रंगवाला हा भाजपचा कुलाबा विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक 224 चा अध्यक्ष असल्याची माहिती समोर आली आहे. तक्रारदार महिलेच्या आरोपानुसार, युसूफ रंगवाला याने रात्री उशिरा, सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास तिला फोन करून "मी एका तासासाठी तुमच्या घरी येऊ का?" अशी मागणी केली. महिलेने त्यास स्पष्ट नकार दिल्यानंतरही आरोपीने तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू ठेवला.

तक्रारीनुसार, नकार मिळाल्यानंतर आरोपीने महिलेला व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल केला. त्या वेळी तो नग्न अवस्थेत होता आणि त्याने अश्लील हावभाव व चाळे केल्याचा गंभीर आरोप महिलेने केला आहे. या प्रकारामुळे आपण मानसिकदृष्ट्या त्रस्त झाल्याचेही महिलेने पोलिसांना सांगितले. महिलेच्या तक्रारीच्या आधारे डोंगरी पोलिसांनी युसूफ रंगवाला याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर झालेल्या गंभीर आरोपांमुळे भाजपची भूमिका काय असेल याकडेही लक्ष लागले आहे. पोलिसांकडून आरोपीची चौकशी करण्यात येत असून उपलब्ध डिजिटल पुराव्यांची पडताळणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अंजुरफाटा रेल्वे परिसरातील २५८ झोपड्यांवर बुलडोझर

Fact Check : आरबीआयने विकलं १२ अब्ज डॉलर सोनं? काय आहे व्हायरल मेसेज मागचं सत्य?

कर्जातून सुटकेसाठी स्वतःच्याच मृत्यूचा बनाव, हत्या करून कारमध्ये मृतदेह पेटवला

देशावर घोंघावतंय सर्वात मोठं संकट! 'गॉडझिला'मुळे धडकी भरली, पुढील ३ महिने अत्यंत महत्त्वाचे; नेमका काय दिला इशारा?

डायबिटीजमध्ये नारळ पाणी पिऊ शकता का? नारळ पाणी प्यायल्याने रक्तातील साखर वाढते की कमी होते? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT